शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सांगलीत पसरली दाट धुक्याची चादर, लहरी हवामानामुळे नागरिक हैराण

By अविनाश कोळी | Updated: November 28, 2022 12:20 IST

हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला व अन्य संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले

सांगली : ऐन थंडीत तापमानात वाढ होत असतानाच सोमवारी पहाटे सांगली शहरावर धुक्याची चादर पसरली. मागील आठवड्यात पावसानेही हजेरी लावली होती. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.सांगली शहर व परिसरात सोमवारी पहाटे साडे पाच वाजल्यापासून धुके पडण्यास सुरुवात झाली. सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके कायम होते. धुक्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी, फिरायला जाणाऱ्या नागरिकांनाही धुक्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. थंडी सक्रीय झाल्यापासून प्रथमच सांगली शहरात धुक्याची हजेरी लागली.गेल्या काही दिवसांत हवामानात बदल होत आहेत. कधी बोचरी थंडी, कधी उकाडा, कधी पाऊस तर कधी धुक्याच्या हजेरीने नागरिक हैराण झाले आहेत. लहरी हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये या हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला व अन्य संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

किमान तापमान २२ अंशावरजिल्ह्याचे सरासरी किमान तापमान सध्या २२ अंश सेल्सिअसवर आहे. गेले काही दिवस २१ ते २२ अंशाच्या घरात तापमान आहे. सरासरीपेक्षा हे तापमान ५ ते ६ अंशाने जास्त असल्याने रात्रीचा उकाडा जाणवत आहे. कमाल तापमान सध्या सरासरीइतके म्हणजेच ३१ अंश सेल्सिअस आहे.

पुढील आठवडा असा असेलतारीख - किमान - कमाल२९ नोव्हेंबर - २१ - ३२३० नोव्हेंबर - २० - ३२१ डिसेंबर - २० - ३१२ डिसेंबर - १९ - ३१३ डिसेंबर - २० - ३१

टॅग्स :Sangliसांगलीweatherहवामान