शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेयच्या मालमत्ता विकून पैसे द्या; गुंतवणुकदारांची सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By संतोष भिसे | Updated: October 2, 2023 17:05 IST

राज्यभरातील सुमारे दोन कोटी १६ लाख ठेवीदारांचे पैसे अडकले

सांगली : मैत्रेय कंपनीत पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कंपनीच्या मालमत्ता विकून  गुंतवणुकदारांना परतावे त्वरित मिळावेत अशी मागणी केली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यांना गती देण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही केली.खटला रेंगाळण्यासाठी कारणीभूत व्यक्तींना अटक करावी, कंपनीचा सर्व्हर व फॉरेन्सिक रिपोर्ट न्यायालयात सादर करावा, कंपनीच्या वसई येथील मुख्यालयासह राज्यभरातील कार्यालयांच्या जागा विकून पैसे जमा करावेत, आजवर मालमत्तांमच्या विक्रीमधून मिळालेले पैसे गुंतवणुकदारांच्या खात्यांत त्वरित जमा करावेत, अन्य मालमत्तांची विक्री प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केल्या.राज्यभरातील सुमारे दोन कोटी १६ लाख ठेवीदारांचे पैसे कंपनीमध्ये अडकले आहेत. ते परत मिळण्यासाठी सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा गुंतवणुकदारांनी दिला.आंदोलनात विनायक चव्हाण, गंगाधर तोडकर, प्रमोद इनामदार, डॉ. गणपती हरपनहळ्ळी, निलिमा कुष्टे, सुप्रिया तोडकर, यासीन सय्यद आदी सहभागी झाले. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजीagitationआंदोलन