शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवारा बांधकाम कामगार संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 14:59 IST

collector Office Morcha Sangli -बांधकाम कामगारांना शासकीय मदतीचे हजारो प्रस्ताव सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात धूळ खात पडले आहेत, ते त्वरीत निकाली काढावेत यासाठी निवारा बांधकाम संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, सुमन पुजारी, विजय बचाटे यांनी नेतृत्व केले.

ठळक मुद्देनिवारा बांधकाम कामगार संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेअंत्यविधीसाठी मदतीच्या फायलीही रखडल्या

सांगली : बांधकाम कामगारांना शासकीय मदतीचे हजारो प्रस्ताव सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात धूळ खात पडले आहेत, ते त्वरीत निकाली काढावेत यासाठी निवारा बांधकाम संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, सुमन पुजारी, विजय बचाटे यांनी नेतृत्व केले.आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. सहाय्यक कामगार आयुक्तांनी कामगारांचे प्रस्ताव अडवून ठेवल्याचा आरोप केला. पुजारी म्हणाले की, २३ जुलैपासून कामगारांच्या प्रस्तावांची ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. त्यापूर्वीचे १० हजार प्रस्ताव सहाय्यक कामगार आयुक्तांनी प्रलंबित ठेवले आहेत.

आचारसंहितेपूर्वी अर्ज येऊनही आता ग्रामपंचायत निवडणुकीची कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे कामगार शासकीय लाभांपासून वंचित राहिले आहेत. या प्रस्तावांची तातडीने नोंद करण्याचे आदेश कामगार आयुक्तांना द्यावेत.नवी सभासद नोंदणी, ओळखपत्रे नुतणीकरण, अवजारे व साहित्य खरेदीसाठी मदतीची मागणी, कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती, प्रसुतीसाठी सहाय्य, गंभीर आजारांवर उपचारासाठी मदत, विवाहासाठी मदत हे विषयदेखील निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यावर त्वरीत कार्यवाहीचे आदेश सहायक आयुक्तांना द्यावेत. कामगार कायदे व कृषी कायदे रद्द करावेत, वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या.

आंदोलनात विशाल बडवे, राम कदम, तुकाराम जाधव, शंकर कुंभार, हणमंत माळी, निलोफर डांगे, संजय डंबे, दादा बुद्रुक, संतोष बेलदार, विष्णू माळी आदींनी भाग घेतला.अंत्यविधीसाठी मदतीच्या फायलीही रखडल्याआंदोलकांनी तक्रार केली की, मृत्यू पावलेल्या वीसहून अधिक कामगारांच्या अंत्यविधीचा निधी तसेच नुकसान भरपाईचे दोन लाख रुपयेदेखील प्रलंबित आहेत. दोन वर्षांपुर्वीच्या महापुरात घरांची पडझड झाल्याने मदतीसाठी कामगारांनी अर्ज केले. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने मदतीची कार्यवाही त्वरीत करण्याचे आदेश दिले, तरीही एक हजार कामगारांचे अर्ज आयुक्त कार्यालयात निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी