शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करूनच इमारत पाडा, गांधी वसतिगृह बचाव समितीची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: August 23, 2023 18:53 IST

महात्मा गांधी वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची गरज

सांगली : महात्मा गांधी वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे. सध्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करून सध्याची इमारत पाडा, त्यास आमची हरकत नाही, अशी मागणी महात्मा गांधी वसतिगृह बचाव आजी-माजी विद्यार्थी कृती समितीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे बुधवारी केली.महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. यामुळे या वसतिगृहात सध्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. तसेच वीज, पाणी तोडण्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्याच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. नूतन इमारतीचा आराखडा मंजूर करून घ्यावा, त्यासाठीची निविदा काढण्याची गरज आहे. नवीन इमारतीची निविदा काढल्यानंतरच जुनी इमारत पाडण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांसह आम्ही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशाराही आंदोलकांनी दिला.यावेळी गांधी वसतिगृह बचाव कृती समितीचे महेश खराडे, ॲड. माणिक पांढरे, सागर चव्हाण, महादेव हिंगमिरे, कबीर मुलाणी, अजित हलिगले, गजानन मुळीक, स्वप्नील महाजन, इरराप्पा सरगर, मल्हारी माळी, प्रशांत व्हनमाने, समाधान पुजारी, गोविंद आर्गे, सलीम तांबोळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

धोकादायक इमारतीत राहणे चुकीचे : तृप्ती धोडमिसेमहात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्यामुळे त्या इमारतीमध्ये राहाणे चिंताजनक आहे. म्हणून धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसह कुणीच राहू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे. शासनाकडे वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला आहे. निधी मंजूर होताच निविदा काढून काम सुरू करण्यात येईल, असेही धोडमिसे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद