पुनवत : येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. शिवाय गेल्या नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुनवत मार्गावर शिराळा आगाराने शाळांच्या वेळेत एस. टी. बससेवा सुरू करावी, अशी मागणी पालक, शाळा तसेच विद्यार्थ्यांनी केली आहे.
पुनवत मार्गावर सध्या शिराळा आगाराच्या मोजक्या बसेस धावत आहेत. मात्र सकाळी आठ तसेच दहा व सायंकाळी पाच वाजता या मार्गावर कोणतीही बस येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेला येता-जाता अनंत अडचणी येत आहेत. पुनवत, कणदूर, सागाव, चिखली, आदी गावांत अनेक माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये आहेत. या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिराळा आगाराने शाळांच्या वेळेत एस.टी. बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.