दलित वस्तीत समाजमंदिराच्या बाजूला दारू दुकान असल्याने सामाजिक कार्यक्रमास अडचण होते. २६ ऑगष्टला ग्रामसभेत दारू दुकान गावापासून दोन किलोमीटरवर अंतरावर नेण्याचा ठराव संमत करण्यात आला.
आठ वर्षापूर्वी दारू दुकान अन्यत्र स्थलांतरासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी दुकानचालकाने एका वर्षात दुकान स्थलांतराची हमी उत्पादन शुल्क विभागास दिली. मात्र आजतागायत दारू दुकानाचे स्थलांतर झाले नसल्याने दलित वस्तीतील ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांना निवेदन देऊन दारू दुकान स्थलांतराबाबत आठ दिवसांत निर्णय न झाल्यास सांगली उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला. अधीक्षक संध्याअणी???? देशमुख यांनी याबाबत चाैकशी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
खटाव गावात दारूबंदी करून दारूदुकान बंद करण्यासाठी गावात महिलांची विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.