शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

मिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वराचे नाव देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:18 PM

railway Sangli News- देशभरात रेल्वेने जाण्याची सोय असणार्या मिरज रेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली आहे. सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलीक यांना त्यासाठी साकडे घालण्यात आले.

ठळक मुद्देमिरज जंक्शनला महात्मा बसवेश्वराचे नाव देण्याची मागणीखासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक यांना साकडे

सांगली : देशभरात रेल्वेने जाण्याची सोय असणार्या मिरजरेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली आहे. सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलीक यांना त्यासाठी साकडे घालण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी नगरसेवक डॉ. महादेव कुरणे, नगरसेवक संजय मेंढे, नगरसेवक गणेश माळी, बी. एस. पाटील, नगरसेविका उमा बनछोडे, गजेंद्र कल्लोळी, जयश्री कुरणे, जयगोंड कोरे, प्रमिला नवले, बाबासाहेब आळतेकर, जितेंद्र ढोले, ईश्वर जनवाडे, वैशाली माळी, विठ्ठल परीट, उमेश हारगे, विनायक शेरबंदे आदींनी भेट घेऊन निवेदन दिले.पदाधिकार्यांनी सांगितले की, मिरजेसह कर्नाटक सीमाभागात लाखोंच्या संख्येने लिंगायत समाज राहतो. त्यांचे आराध्य दैवत असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे नाव मिरज जंक्शनला देण्याने समाजाची एक मुख्य मागणी पूर्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा आहे.

देशभरात दिल्ली, मुंबई अशा अनेक जंक्शन स्थानकांना विविध महात्म्यांची नावे देण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर मिरज जंक्शनचेही नामकरण करावे. कर्नाटकातील हजारो प्रवासी दररोज मिरज जंक्शनमधून प्रवास करतात. जंक्शनच्या नामकरणाने त्यांचीही मागणी पूर्ण होणार आहे. नामकरणासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंडलीक व माने यांनी दिले. 

टॅग्स :railwayरेल्वेmiraj-acमिरजSangliसांगलीSanjay Mandalikसंजय मंडलिकMember of parliamentखासदार