शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात हलगी वादकांना 'अच्छे दिन'; आचारसंहितेमुळे ध्वनीक्षेपकांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:50 IST

उत्सवांमध्ये पारंपारिक वाद्यांना मागणी वाढली

सहदेव खोत पुनवत: सध्या लग्नसराई आणि गावोगावच्या यात्रा सुरू झाल्यामुळे पारंपारिक हलगी वादकांना अच्छे दिन आले आहेत . लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने मोठ्या आवाजातील ध्वनीक्षिपकांवर निर्बंध आल्याने हलगी, बँड, बेंजो वादकांचा व्यवसाय तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.ग्रामीण भागात सध्या लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे त्यातच गावोगावच्या यात्राही सुरू झाले आहेत. अलीकडच्या काळात यात्रा उत्सव तसेच लग्नसराई मध्ये सर्व युवकांना डॉल्बीचे वेड असते परंतु सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने डॉल्बी सारख्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांवर मोठे निर्बंध आले आहेत. त्यामुळे आपोआपच या सर्व उत्सवांमध्ये पारंपारिक वाद्यांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावागावात हलगी या पारंपारिक वाद्याचे वादक असून अनेक गावात हलगी बरोबरच लेझीम चा खेळ सुद्धा प्रसिद्ध आहे या सर्व समारंभाच्या निमित्ताने हलगी वादकांना लोक सध्या पसंती देताना दिसत आहेत. लग्नामधील सर्व कार्यक्रमांमध्ये हलगी वादक दिसत आहेत त्याचबरोबर यात्रेमधील पालखी मिरवणूक तसेच कुस्ती मैदानात सुद्धा हलगी वादकांना मोठी पसंती मिळत आहे.

ग्रामीण भागात जुन्या पारंपारिक वाद्यांचे रसिक अजून मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या पारंपारिक वाद्यांमुळे सर्व रसिकांची चांगलीच करमणूक होत आहे. गावोगावच्या कुस्ती मैदानात तर हे हलगी वादक उत्साह आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे 

सध्या लग्न समारंभ,यात्रांमध्ये हलगी वादकांना मोठी मागणी आहे .त्यामुळे या कलावंतांना रोजगार मिळत आहे.ग्रामीण भागात आम्हा कलाकारांना चांगला सन्मान मिळत असल्याने समाधान मिळते  - राजेंद्र दाभाडे, हलगीवादक, वारणा कोडोली

टॅग्स :Sangliसांगली