शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, गर्भवती महिला वनरक्षकाचे वन कार्यालयासमोर उपाेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:03 IST

वरिष्ठ अधिकारी वन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. हा त्रास बंद झाला पाहिजे

कुपवाड : कर्मचाऱ्यांना अकारण त्रास देणारे शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव व इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले यांना निलंबित करावे, या मागणीसाठी रेड (ता. शिराळा) येथील वनरक्षक रायना बापू पाटोळे या ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेने कुपवाड येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासाेबत सचिन कचरे व इतर आठ वन कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलनावेळी अधिकाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. वरिष्ठ अधिकारी वन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. हा त्रास बंद झाला पाहिजे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी पाटाेळे म्हणाल्या, रेड (ता. शिराळा) येथे वनरक्षक म्हणून चार वर्षांपासून मी काम करीत आहे. कार्यक्षेत्रात कोणाकडूनही माझ्याबाबत कोणतीही तक्रार नाही. माझ्या कार्यक्षेत्रातील शेखरवाडी वनक्षेत्रामध्ये शेखरवाडी ते इंगरूळ रस्त्यांचे काम होणार होते. त्याकामी बांधकाम विभाग व ठेकेदारास परवाना घेतल्याशिवाय कामे करू नका, असे सांगितले होते.

याबाबत वनक्षेत्रपाल सचिन जाधव व वनपाल सुरेश चरापले यांनाही माहिती दिली होती. पण, त्यांनी तडजोड करून आर्थिक व्यवहार करून माझ्या ताब्यात असलेल्या वनक्षेत्रामध्ये अवैध मार्गाने काम करण्यास परवानगी दिली. येथे अंदाजे ४५० ब्रास दगडाचे उत्खनन झाले आहे. त्यामुळे मी माझी जबाबदारी म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला.या गुन्ह्यामध्ये वनपाल व वनक्षेत्रपाल हे स्पष्टपणे सहभागी आहेत. याबाबत मी तक्रार अर्जदेखील केला होता. पण, आपण अडचणीत येऊ म्हणून त्यांनी माझ्यामुळे रस्त्याचे काम बंद पडले असे भासवून माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले. मला कामामध्ये नाहक त्रास दिला. याबाबत वरिष्ठांकडे दाद मागूनही मला प्रतिसाद मिळाला नाही. सक्तीच्या रजेवरही पाठवले.आंदोलनात राजश्री पाटील, विलास कदम, सुभाष पाटील, शिवाजी सावंत, गौरव गायकवाड, शिवाजी पवार, सचिन पाटील, किरण मोरी, तानाजी पाटील, सचिन कदम, नामदेव सिद, पांडुरंग उगळे या वन कामगारांसह सचिन कचरे (मरळनाथपूर) यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग