शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सांगलीतील गौरीच्या मुखवटयांची परदेशातील भारतीयांना भुरळ

By हणमंत पाटील | Updated: September 19, 2023 18:32 IST

मागणीनुसार गौरींचे मुखवटे अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशात पाठविले

सांगली : गौरींचे आगमन आता दोन दिवसांवर आले आहे. गणपतीबरोबरच गौरी मुखवटे तयार करण्याची लगबग आता संपली आहे. सांगलीतील मुर्तीकार अरविंद तोगरे यांनी तयार केलेल्या गौरीच्या मुखवट्यांना परदेशातील भारतीय नागरिकांकडून मागणी आहे. त्यामुळे मागणीनुसार सांगलीतील गौरींचे मुखवटे अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशात पाठविले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरातमधून अजूनही गौरीचे मुखवट्यांना मागणी आहे.सांगतलीच्या अरविंद तोगरे यांच्या ओम आर्टस कार्यशाळेतही हे गौरीचे मुखवटे व मुकुट तयार केले जातात. गौरी मुखवट्यांचे काम परदेशात मागणी असल्याने वर्षभर सुरू असते. अरविंद तोगरे हे स्वतः एम आणि जीडी आर्ट आहेत. त्यांचे वडील विजयकुमार तोगरे आणि सासरे विट्याचे दत्तात्रय बीडकर गणपती मूर्ती आणि गौरी मुखवटे तयार करायचे. त्यामुळे गेली पन्नास वर्षं गौरी मुखवट्यांचा हा पारंपारिक व्यवसाय सुरू आहे.

असे बनवितात मुखवटे..अगोदर साचा निर्मिती, मुखवटा घडवणे, फिनिशिंग, रंगकाम, दागदागिन्यांची कलाकुसर, डोळे, भुवया, नाक, ओठ यांचे नाजूक काम अशा अनेक टप्प्यांमधून हे मुखवटे आकाराला येतात. सजीव डोळे, धारदार नाक, नाजूक जिवणी आणि सुबक ठेवण हे या मुखवट्यांचं वैशिष्ट्ये आहेत. गौरीचे शाडूचे मुखवटे नाजूक असतात. त्यामुळे ते हळूवारपणे हताळावे लागते. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गौरी मुखवटे तयार केले जातात. एका गौरी मुखवटयाचं वजन १०० ग्रॅमच्या आसपास असतं. हे गौरी मुखवटे दरवर्षी विसर्जित केले जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाला फारशी हानी होत नाही.

मुखवटे सातासमुद्रपार पोहोचले..मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद. परळी वैजनाथ आणि पंढरपूर अशा भागांतून तोगरे यांच्या गौरी मुखवटयांना मोठी मागणी आहे. या ओम आर्टसचे हे मुखवटे अगदी सातासमुद्रापारही पोहोचलेत. दागदागिने आणि आकार यांच्यात विविधता असलेले ८ ते ९ प्रकारचे गौरी मुखवटे इथे पाहायला मिळतात. त्यावरुनच त्यांचा दर ठरतो. आता पहिल्या टप्प्यात साधारणपणे दोन हजार गौरींचे मुखवटे तयार होऊन रवाना झालेत. तर दुस-या टप्प्यातल्या गौरींच्या मुखवट्याचं ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिका या राज्यांमध्ये पोहोच झाले आहेत, अशी माहिती अरविंद तोगरे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सव