शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पुसेसावळीत प्रक्षोभक पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी, सांगलीत हिंदू एकताचे आंदोलन

By संतोष भिसे | Updated: October 7, 2023 16:21 IST

सांगली : पुसेसावळी (जि. सातारा) येथील दंगलीमध्ये काही तरुणांनी विशिष्ट हेतूने प्रक्षोभक पोस्ट समाजात व्हायरल केल्या. त्यांना शोधून कडक ...

सांगली : पुसेसावळी (जि. सातारा) येथील दंगलीमध्ये काही तरुणांनी विशिष्ट हेतूने प्रक्षोभक पोस्ट समाजात व्हायरल केल्या. त्यांना शोधून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन संघटनेने केली. सांगलीत शनिवारी स्टेशन चौकात धरणे आंदोलन केले. यामध्ये माजी आमदार नितीन शिंदे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाटील, परशुराम चोरगे, शिवाजीराव दुधाळ आदी सहभागी झाले.शिंदे म्हणाले, भावना दुखावणाऱ्या पोस्ट काही तरुणांनी हेतूपुरस्पर व्हायरल केल्या. त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. पोस्ट व्हायरल करणाऱ्यांनी पोलिस कोठडीतून बाहेर आल्यावरही पुन्हा तोच प्रकार केला. त्यामुळे यामागील कटकारस्थान आणि दूषित हेतू स्पष्ट दिसतो. त्यांना शोधून पोलिसांनी पुन्हा कारवाई केली पाहिजे. पण सातारा पोलिसांची कारवाईदेखील पक्षपाती दिसते. कोणाच्या तरी दबावाखाली येऊन गुन्हे दाखल केले आहेत. याविरोधात आम्ही शासनाकडे दाद मागू.जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाटील म्हणाले, या तरुणांच्या मागे कोणती संघटना आहे याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. निर्दोष तरुणांना सोडले पाहिजे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. गुन्हेगार तरुणांना दंगलीच्या काळात कोण आश्रय दिला. त्यांची वकीलपत्रे कोणी घेतली याचीही चौकशी व्हायला हवी. तरुणांवर पक्षपाती कारवाया सुरूच राहिल्या, तर सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची भिती आहे.आंदोलनात कलगोंड पडसलगे, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे, प्रकाश चव्हाण, संकेत जाधव, अशोक पाटील, अमोल गवळी, अमर माने, महेश ऐतवडे, सूर्यकांत शेगणे, संदीप ताटे, तानाजी चव्हाण, सोमनाथ गोटखिंडे, राहुल जाधव आदी सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर