शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

डी.एड्., बी.एड्. धारकांचा शासनाने अंत पाहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:38 IST

राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्.,

ठळक मुद्देसंतोष मगर : सांगलीत डी.एड्., बी.एड्. स्टुडंट असोसिएशनची बैठक, आंदोलनाचा इशारा

सांगली : राज्यभरात शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, शासनाकडून भरतीविषयी केवळ आश्वासन देण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीची केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्याअगोदर भरती पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने डी.एड्., बी.एड्.धारक तरूणांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र लढा उभारण्याचा इशारा डी.एड्., बी.एड्. स्टुडंट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष संतोष मगर यांनी सोमवारी सांगलीत दिला.

शिक्षक भरतीविषयी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.ते म्हणाले, राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही तरूणांना बेरोजगार ठेवण्यातच शासन धन्यता मानत आहे. संघटनेने पाठपुरावा सुरू असल्याने भरती प्रक्रियेस गती मिळाली असली तरी, प्रत्यक्षात भरती झालेली नसल्याने तरूणांमध्ये अस्वस्थता आहे. शिक्षक भरती पारदर्शीपणे व गुणवत्तेनुसार व्हावी, यासाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणीस दीड वर्षाचा कालावधी झाला आहे, टीईटी परीक्षेतून हजारो डी.एड्., बी.एड्. धारक तरूण गुणवत्ता सिध्द करत असतानाही, शासनाकडून त्यांच्या भावनेशी खेळ चालविला आहे.

बिंदुनामावलीचा विषय असो अथवा प्रशासकीय पातळीवर भरती, ही प्रक्रिया गतीने पूर्ण होण्यासाठी संघटनेने पाठपुरावा केला आहे. पुण्यातील शिक्षण संचालनालयासमोर आणि मंत्रालयासमोर संघटनेने वारंवार आंदोलन केल्याने प्रक्रिया गतीने सुरू असली तरी, अद्याप नियुक्तीचे आदेश मिळत नाहीत. त्यामुळे आता तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिते त्याअगोदर कोणत्याही परिस्थितीत जादा संख्येने शिक्षक भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाभरातून आलेले डी.एड्., बी.एड्. धारक तरूण, तरूणी उपस्थित होत्या.पुण्यात आंदोलनशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, ३ फे ब्रुवारीपासून शिक्षक भरतीची जाहिरात येण्यास सुरूवात होईल, असे सांगितले आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. पण मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३१ जानेवारीपासून पुण्यात बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. ३ रोजी जाहिराती येण्यास सुरूवात झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचेही मगर यांनी सांगितले.सांगली येथे शिक्षक भरतीसंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत संतोष मगर यांनी मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक