शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भूजल पातळीत दीड फुटाने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:44 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वेगाने घटत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षीच ही पातळी घटत चालली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट झाली असून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या तालुक्यातील घट वेगाने वाढत आहे.गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनने दगा दिल्याने जिल्ह्यातील पर्जन्यमानातही घट जाणवत आहे. यंदाही पावसाची सरासरी गाठली नसल्याने नैसर्गिक संकट वाढत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पाणी योजनांतून आवर्तन सुरू असून त्याचा फायदाही होत आहे. मात्र, पाऊसही कमी आणि योजनांचे पाणी न पोहोचलेल्या भागातील भूजल पातळी घटतच चालली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार करण्यात आला आहे. विभागाच्यावतीने वर्षात किमान चारवेळा भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. मार्च महिन्यातील अहवालानुसार जिल्ह्यात जत तालुक्यातील भूजल पातळीत सव्वा मीटरने घट झाली आहे. त्यानंतर आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही हेच संकट निर्माण झाले आहे.पावसाने अथवा जलस्रोतांच्या माध्यमातून जमिनीत मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच भूजल पातळीत घट नोंदविली आहे. ज्या भागात म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेचे पाणी पोहोचले आहे, त्या ठिकाणी मात्र, पाणी पातळी स्थिर असली तरी ती समाधानकारक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाऊस नाही, त्याच भूगर्भातील पाण्याचाही बेसुमार उपसा होत असल्यानेच हे संकट निर्माण झाले आहे. शहरात पाण्याचा बेसुमार अपव्यय होतो आहे, तर त्याचवेळी ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी मैलोन् मैलची भटकंतीही करावी लागत आहे. प्रशासनाच्यावतीने जनजागृती करण्यात येत असली तरी नागरिकांना त्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्याच्या पाऊसमानाचा विचार केला, तर मान्सूनवर भरवसा असला तरी त्याचेही प्रमाण घटतच चालले आहे. त्यात जत, आटपाडीसह काही भागाला परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टॅँकरसह इतर उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या असल्या तरी जिथे निसर्गच कोपला आहे, तिथे प्रशासनाचीही हतबलता होत आहे. बांधबंदिस्तीकरण व जलयुक्त शिवारसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीच निसर्गाच्या संकटाशी दोनहात करण्यास उपयोगी ठरणार आहेत.मे महिन्यातही पडताळणीविभागाच्या नियोजनाप्रमाणे वर्षातून चार वेळा पाणी पातळी निरीक्षण अहवाल तयार केला जातो. यावरच दुष्काळी उपाययोजना ठरविल्या जातात. मे महिन्यात पुन्हा पडताळणी होणार आहे.सधन तालुक्यातही भूजल पातळी घटलीजिल्ह्यातील सधन तालुका असलेल्या वाळवा तालुक्यातील भूजल पातळीत यंदाही घट झाली आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठे असून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याऐवजी बेसुमार वापरामुळेच हे संकट निर्माण झाले आहे. वाळवा तालुक्याबरोबरच पलूस तालुक्यातील पाणी पातळी स्थिर असली तरी, त्यातही घट जाणवली आहे. शिराळा तालुक्यातील जलस्रोत समाधानकारक आहेत.