शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

प्रत्येक प्रभागासाठी आता ४० सफाई कामगार सांगली महापालिका बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:03 IST

महापालिकेकडील सफाई कामगारांच्या असमान वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गेल्या चार महिन्यांपासून आवाज उठविला होता.

ठळक मुद्देचार महिन्यांच्या संघर्षानंतर समान वाटप; फेब्रुवारीपासून होणार अंमलबजावणी

सांगली : महापालिकेकडील सफाई कामगारांच्या असमान वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गेल्या चार महिन्यांपासून आवाज उठविला होता. सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी त्याला साथ दिली होती. अखेर प्रत्येक प्रभागासाठी समान ४० सफाई कामगार देण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येत्या ९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी प्रशासनाला दिले.

महापौर खोत यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कामगार वाटपाबाबत महापालिकेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आयुक्त रवींद्र खेबूडकर, गटनेते युवराज बावडेकर, उपायुक्त मौसमी बर्डे, कामगार अधिकारी चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्यासह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या काही प्रभागात २० ते २५ सफाई कामगार होते, तर काही प्रभागात ७० हून अधिक कामगार काम करीत आहेत.

उपनगरे, विस्तारित भागात कामगारांची संख्या कमी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडला होता. गेल्याच महासभेत काँग्रेसचे मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांच्यासह सदस्यांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले होते. महापौरांनी सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार ही बैठक झाली.

बैठकीनंतर खोत म्हणाल्या की, सहायक मुकादम, ड्रेनेज, रुग्णालये व कार्यालयीन कामासाठीचे कामगार वगळता आरोग्य विभागाकडे सफाई कामासाठी ८८३ कर्मचारी शिल्लक राहतात. महापालिकेचे २० प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात ४० सफाई कामगार दिले जातील. उर्वरित ८३ कामगारांचे विशेष पथक तयार केले जाणार आहे. या पथकामार्फत आठवडा बाजार व इतर जादाची कामे करून घेतली जातील.

सध्या महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर लक्ष केंद्रित केले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्रीय पथक तपासणीसाठी येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात कसलाही विस्कळीतपणा होऊ नये, यासाठी ८ फेब्रुवारी रोजी कामगारांचे समान वाटप करण्यात येईल. महापालिकेच्या वर्धापनदिनादिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात समान सफाई कामगार वाटपाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे स्पष्ट केले.

योगेंद्र थोरात म्हणाले की, या निर्णयामुळे मिरज शहरावरील अन्याय दूर होणार आहे. मिरजेत एकेका प्रभागात २३ कामगार आहेत. विस्तारित प्रभागातही कामगार कमी आहेत. या निर्णयामुळे प्रत्येक प्रभागाला किमान १७ कामगार वाढवून मिळतील. चार महिन्यांच्या संघर्षानंतर समान वाटपाबाबत यश मिळाल्याचे सांगितले. उपायुक्त मौसमी बर्डे म्हणाल्या की, शहर स्वच्छतेचे काम केवळ कामगारांवर टाकून चालणार नाही. त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, योगेंद्र थोरात, संगीता हारगे, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, गीता सुतार, कल्पना कोळेकर, सविता मदने, आरती वळिवडे आदी उपस्थित होते.सफाईवर ८८३ कामगारमहापालिका क्षेत्राच्या स्वच्छतेसाठी ११०० कामगार आहेत. त्यात ६१० कायम, खास कामगार १४०, तर ३६० हे मानधनावरील आहेत. त्यापैकी ११५ कामगार कार्यालयात, १२ जण रुग्णालयात, ४५ जण ड्रेनेज विभागाकडे आहेत. ४० सहायक मुकादम व १५ प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सफाईच्या कामासाठी तीन शहरात ८८३ कामगारच उपलब्ध आहेत.सातवा वेतन : कशासाठी हवा?- आयुक्तनगरसेविका गीता सुतार यांनी काही सफाई कामगार केवळ दोन तासच काम करतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्त खेबूडकर यांनी सहमती दर्शविली. सफाई कामगारांना गणवेश दिले आहेत; पण एकजणही हा गणवेश घालत नाही. कामचुकार कामगारांना प्रशासनाचे कसलेही पाठबळ नसते. त्यांना कोण पाठबळ देतो? हे तपासा. कामगार संघटना आता सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करीत आहेत; पण कामगारांकडून महापालिकेला किती उत्पन्न मिळते? एक रुपयाही मिळत नसताना सातवा वेतन मात्र हवा आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला. कामचुकार कामगाराबद्दल थेट माझ्याकडे तक्रार करा, त्याला घरी घालवले जाईल, अशी ग्वाहीही दिली. 

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान