शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पास डिसेंबरची मुदत

By admin | Updated: January 24, 2017 00:51 IST

हरित न्यायालयाचा आदेश : महापालिकेच्या प्रकल्पाला सशर्त मंजुरी; महासभेत सादर होणार आराखडा

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आराखड्याला हरित न्यायालयाने सशर्त मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत दिली असून, प्रकल्पाचे काम आराखड्यानुसार होते की नाही, याच्या निरीक्षणासाठी उच्चस्तरीय समितीही नियुक्त केली आहे. येत्या दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत घनकचरा प्रकल्पाचा आराखडा सादर होणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर प्रकल्पाची निविदा काढून कामाला सुरूवात होईल. त्यामुळे महापालिकेला आठ ते दहा महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. महापालिका क्षेत्रातील घनकचराप्रश्नी जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. हरित न्यायालयात याचिका दाखल होऊनही महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली नाही. अखेर न्यायालयाने पालिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढत घनकचरा प्रकल्पाला गती दिली. त्यासाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे ६० कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिका बरखास्त करू, अशा इशारा दिला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अजिज कारचे यांनी वित्त आयोगासह पालिकेच्या निधीतून विभागीय आयुक्तांकडे ४३ कोटी रुपये जमा केले आहेत. घनकचरा आराखडा तयार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने त्रिस्तरीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार व देखरेखीखाली प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. या प्रकल्पाचे काम मूळ आराखड्यानुसार होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी हरित न्यायालयाने उच्चस्तरीय समितीही नियुक्त केली आहे. या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी व वालचंद महाविद्यालयाच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. या समितीला दर दोन महिन्यांनी प्रकल्प कामाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करावा लागणार आहे.महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापोटी ४३ कोटी विभागीय आयुक्तांकडे जमा केले आहेत. सध्याच्या प्रकल्पाची किंमत ४२ कोटी आहे. त्याशिवाय घनकचरा प्रकल्पासाठी भविष्यात शासनाकडूनही अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामुळे हरित न्यायालयाने घनकचऱ्यासाठी प्राप्त निधीचा कसा विनियोग करावा, याचे आदेशही महापालिकेला दिले आहेत. यात प्रकल्प आराखड्यातील शिल्लक निधी व भविष्यात शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान यातून घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया, बायोमिशेन प्रक्रिया केंद्रांवरच खर्च करण्याची अट न्यायालयाने घातली आहे. (प्रतिनिधी)सुधार समितीचे न्यायालयाकडून कौतुकघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा सुधार समितीने गेली दोन वर्षे हरित न्यायालयात यशस्वी लढा दिला. सुरूवातीला घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी सुधार समितीने महापालिकेला वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. पण त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले. अखेर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे व सहकाऱ्यांनी हरित न्यायालयात धाव घेतली. पाठपुरावा केला. समितीच्या प्रयत्नांचे हरित न्यायालयानेही कौतुक केले आहे. आम्ही प्रकल्पावर लक्ष ठेवणार आहोत, महापालिकेने आराखड्यानुसार गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असे अ‍ॅड. शिंदे यांनी सांगितले.