शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आधार प्रमाणीकरणामुळे अडले कर्जमाफीचे घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 17:35 IST

आधार कार्डच्या प्रमाणीकरणाअभावी सांगली जिल्ह्यातील ३ हजार ७१0 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधून नाराजी आहे.

ठळक मुद्देआधार प्रमाणीकरणामुळे अडले कर्जमाफीचे घोडेप्रक्रिया रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधून नाराजी

सांगली : आधार कार्डच्या प्रमाणीकरणाअभावी सांगली जिल्ह्यातील ३ हजार ७१0 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधून नाराजी आहे.शासनाच्या विविध योजना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रेंगाळल्या आहेत. त्यात कर्जमाफी योजनेलाही फटका बसला आहे. एप्रिल २0१५ ते ३१ मार्च २0१९ पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३0 सप्टेंबर २0१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम २ लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना अल्प आणि अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील ६२ हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत ३४१ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शासनाकडून कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द कलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर योजनेअंतर्गत लाभ दिला नाही, अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप २0२0 साठी पीक कर्ज देण्यात यावे.

या शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम व शासनाकडून ही रक्कम जिल्हा बँकांना मिळेपर्यंतचे व्याज शासनाकडून मिळणार आहे. त्यामुळे बँकांसमोरील व्याजाची चिंता दूर झाली आहे. या शेतकऱ्यांना खरीप २०२० साठी पीक कर्जपुरवठा करावा, असा शासन निर्णय नुकताच झाला आहे. सहकार विभागाने २२ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार कर्जमाफीची रक्कम जिल्हा बँकांना शासनाकडून नंतर मिळणार आहे. तोपर्यंतचे व्याजही देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ९0 हजार १0७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ५२८ कोटी रूपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असा अंदाज होता. अंतिम यादीनंतर किती कर्जदारांना लाभ मिळणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSangliसांगली