शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू, सांगलीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:33 IST

सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या या घटना घडल्या. घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू, सांगलीतील घटना नातेवाईकांचा गोंधळ; चौकशीसाठी समितीची नियुक्ती

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या या घटना घडल्या. घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

रेहाना उस्मानगणी मुतवल्ली (वय २३, रा. संजयनगर, बेघर वसाहत सोसायटी, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना मुलगा झाला होता. काही तासाने त्याचाही मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तारदाळ (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मी संतोष पाटील (२५) या प्रसूत झाल्यानंतर त्यांना झालेल्या मुलाचाही मृत्यू झाला.

रेहाना मुतवल्ली यांना पहिला अडीच वर्षाचा मुलगा आहे. त्यांची पहिली प्रसूती सिझर करुन झालेली होती. दुसऱ्यावेळी गरोदर राहिल्यानंतर खासगी डॉक्टरांनी त्यांना सिझर करण्यास सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दि. ४ मार्चला त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले होते.

डॉक्टरांनी सिझर करण्यास नकार देऊन साधेपणाने प्रसूती होईल, असे सांगितले. दुसऱ्यांदिवशी गुरुवारी नातेवाईकांनी सिझर करण्याचा आग्रह केला. परंतु डॉक्टरांनी नकारच दिला. शुक्रवारी पहाटे साधेपणाने त्यांची प्रसूती झाली. त्यांना मुलगा झाला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रेहाना यांचा मृत्यू झाला. मुलाची प्रकृतीही चिंताजनक बनली होती. मात्र त्याचाही काही वेळानंतर मृत्यू झाला.

रेहाना यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने सिव्हिलमध्ये दाखल झाले. त्यांनी गोंधळ घालून डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरुन रेहाना यांच्या मृत्यूचा जाब विचारला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक प्रताप पोमण यांनी नातेवाईकांना शांततेचे आवाहन केले. अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, पोलीस अधिकारी व रेहाना यांचे नातेवाईक यांची संयुक्तपणे बैठक झाली. बैठकीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय समिती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. विच्छेदन तपासणी करुन रेहाना यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दुसऱ्या घटनेतील लक्ष्मी पाटील यांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांचे पहिले सिझर झाले होते. गुरुवारी दुपारी त्यांना प्रसूतीसाठी सिव्हिलमध्ये दाखल केले होते. नातेवाईकांनी सिझर करण्याची मागणी केली. डॉक्टरांनी नकार दिला. शुक्रवारी पहाटे साधेपणाने त्यांची प्रसूती झाली. त्यांना मुलगा झाला होता. परंतु मलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची चौकशी करावी, अशीही मागणी केली. त्यानुसार वैद्यकीय समिती याचीही चौकशी करणार आहे.आठ बाटल्या रक्तमहिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रसेचे संजय बजाज, विनया पाठक, दीपक माने, संध्या आवळे, आयेशा शेख, अनिता पांगम, संध्या आवळे यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतले. डॉक्टरांना जाब विचारला. पण डॉक्टरांनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही.

विनया पाठक म्हणाल्या, रेहाना यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानंतर नातेवाईकांकडून रक्ताच्या आठ बाठल्या मागवून घेतल्या. महागडी औषधेही बाहेरुन आणण्यास सांगितले. तरीही रेहानाचा जीव वाचविता आला नाही. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनेप्रकरणी प्रसूती कक्षातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे.पोलिसांकडून तपासविश्रामबाग पोलीस ठाण्यात रेहाना यांच्या अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृत्यूची चौकशी सुरु केली आहे, असे निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले. ते म्हणाले, विच्छेदन तपासणीचा अहवाल व वैद्यकीय समितीचा चौकशीनंतर काय अहवाल येतो, हे पाहून तपास करण्यात येईल. 

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल