शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘डीजे’ने तरुणाचा मृत्यू, दुधारीतील गणेश मंडळाच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:32 IST

इस्लामपूर : पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विना परवाना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून ‘डीजे’ लावल्याबद्दल दुधारी (ता. वाळवा) येथील ...

इस्लामपूर : पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विना परवाना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून ‘डीजे’ लावल्याबद्दल दुधारी (ता. वाळवा) येथील त्रिमूर्ती मंडळाच्या ११ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘डीजे’च्या दणदणाटानंतर दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी केवळ विना परवाना मिरवणूक काढली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमजान अल्ताफ मुल्ला, उत्तम वसंत कुंभार, दीपक रामचंद्र कांबळे, योगेश मधुकर गोतपागर, संकेत सूर्यकांत पाटोळे, तानाजी महादेव शिरतोडे, सुशांत पोपट पाटोळे, विशाल नामदेव बनसोडे, विनोद श्रीरंग पाटोळे, महेश जगन्नाथ दळवी (सर्व रा. दुधारी), सुरज कमरुद्दीन मुलाणी (वय २५, रा.बलवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमरुद्दीन मुलाणी याने त्याचे ताब्यातील वाहन (एमएच ०९ ए ७७५१) मध्ये विना परवाना साऊंड सिस्टीम लावून सार्वजनिक उपद्रव करून व पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर सार्वजनिक उपद्रव केला. त्यामुळे सर्वांविरुद्ध हवालदार सचिन यादव यांनी कलम १८८,२९०, २९९, ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३(र) (३) / १३१ प्रमाणे कायदेशीर तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक हरिशचंद्र गावडे पुढील तपास करीत आहेत.

‘डीजे’ वर तांत्रिक सोपस्कारदुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. गुन्हा दाखल करताना या घटनेचा उल्लेख न करता केवळ परवाना न घेता डॉल्बीचा वापर केला असा उल्लेख फिर्यादीत केला आहे. तपास करण्याच्या दृष्टीने केवळ तांत्रिक पद्धतीने गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सव