शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

लग्नादिवशीच नवरदेवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम करणाºया रवींद्र पिसे या तरुणाचा विवाह कोल्हापूर येथील नात्यातीलच तरुणीबरोबर ठरला होता. शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता. वधूसह वºहाडी मंडळींचे शुक्रवारीच आगमन झाले होते. गेले आठवडाभर पिसे कुटुंबियांची लग्नाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. शुक्रवारी टाकळी रस्त्यावरील मंगल कार्यालयात साखरपुडा व हळदी सभारंभ मित्र व नातेवाइकांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. टेलरकाम करणारे रवींद्रचे वडील, आई, विवाहित बहिणीसह वधूकडील मंडळी सर्वजण शनिवारी होणाºया शुभकार्यासाठी आनंदात होते.श्निवारी सकाळी नऊच्या दरम्यान रवींद्रला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो मंगल कार्यालयातून कोणालाही न सांगता घरी आला. घरी आल्यानंतर उलटी झाल्याने घरासमोरील खासगी डॉक्टरांनी तपासून त्याचा रक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रवींद्रची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास वॉन्लेस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तीन तास अगोदर रवींद्रच्या अकस्मात मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. रवींद्रसोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर आभाळच कोसळले. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरू होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. शुभकार्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.धावपळ लग्नाची आणि अंत्यसंस्काराचीएम. कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या रवींद्रला दोन वर्षांपूर्वी खासगी बँकेत नोकरी मिळाली. नोकरीनंतर सहा महिन्यांपूर्वी घर बांधून झाले. नोकरी व घराची व्यवस्था झाल्यानंतर रवींद्रचे लग्न जुळले. मात्र, लग्नापूर्वीच रवींद्रचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करणाºया मित्र व नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी धावपळ करावी लागली. नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाइकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर तर आभाळच कोसळले.