शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांच्या पुरस्कारासाठी सौदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 17:34 IST

बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा ाासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून पुरस्काराच्या रकमेतून २० ते २५ हजार रुपये देण्याची मागणी करून, पुरस्कारांसाठी सौदा करण्याचे कारनामे सुरू असल्याचे चर्चेत आले आहेत.

ठळक मुद्देबचत गटांच्या पुरस्कारासाठी सौदापुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क

तासगाव : बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या, उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बचत गटांना यंदा शासनामार्फत हिरकणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुक्यातील दहा गटांना हा पुरस्कार मिळणार आहे. हे पुरस्कार जाहीर होण्याआधीच संभाव्य गटांतील महिलांशी संपर्क साधून पुरस्काराच्या रकमेतून २० ते २५ हजार रुपये देण्याची मागणी करून, पुरस्कारांसाठी सौदा करण्याचे कारनामे सुरू असल्याचे चर्चेत आले आहेत.तासगाव तालुक्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कारभाराचे अनेक नमुने चव्हाट्यावर येत आहेत. ताुलक्यात सुमारे दोन हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून वीस हजारपेक्षा जास्त महिला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी संबंधित आहेत.या बचत गटांना पाठबळ देण्यासाठी, आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकास्तरापर्यंत शासनाकडून यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र या यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी सामान्य कुटुंबातील महिलांची लुबाडणूक करण्याचे उद्योग केले आहेत. महिलांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत, बचत गटांच्या नावावर कर्ज काढून पैसे घेतले गेले आहेत. हे पैसे परत कसे मिळणार? असा प्रश्न बचत गटांच्या महिलांसमोर आहे.बचत गटांच्या माध्यमातून कर्ज काढून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांकडून पैसे घेऊन त्यांचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर कर्तृत्वसंपन्न बचत गटांना राज्य शासनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पुरस्कार देण्याची अभिनव योजना जाहीर केली आहे.चांगले काम असणाऱ्या गटांना शासनाकडून ५० हजार रुपयांच्या बक्षिसासह हिरकणी पुरस्कार देण्यात येत येणार आहेत. या पुरस्कारासाठी तासगाव तालुक्यातून सुमारे ३५ प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांची तालुकास्तरावरील समितीकडून छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दहा गटांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करून हिरकणी पुरस्कार देणयत येणार आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे हे पुरस्कार लांबणीवर पडले होते. मात्र हे पुरस्कार अद्याप जाहीरही झालेले नाहीत. मात्र पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या काही बचत गटांतील महिलांशी पंचायत समितीतील एका प्रभाग समन्वयकाने संधान साधले.

तुम्हाला हिरकणी पुरस्कार देण्यात येईल, मात्र त्यासाठी तुम्हाला दहा ते वीस हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. काही महिलांनी पुरस्कार मिळणार असतील, तर पैसे देण्याची तयारी दर्शवली. हे पैसे मागताना, आणखी काही अधिकाऱ्यांनाही ही रक्कम द्यायची असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुरस्कार मिळण्याआधीच बचत गटांकडून पैसे हडप करण्याचे कारनामे सुरु असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगली