शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

औदुंबर मध्ये दत्त जयंती उत्साहात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:19 IST

Datta Jayanti Sangli- दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंराच्या गजरामध्ये सायंकाळी ५.३० वाजता श्री क्षेत्र औदुबंर येथे श्री दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदीर परीसरामध्ये केवळ पुजारी, देवास्थानचे विश्वस्थ, सेवेकरी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जन्मकाळ संपन्न झाल्यानंतर रंगीबेरंगी फुलांनी परिसर फुलुन गेला होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने आज दत्त जयंती निमित्ताने यात्रा उत्सवावर निर्बंद घातले होते. त्यामुळे मंदीर परिसर भाविका विना रिकामा होता.

ठळक मुद्दे औदुंबर मध्ये दत्त जयंती उत्साहात संपन्न

अंकलखोप -दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंराच्या गजरामध्ये सायंकाळी ५.३० वाजता श्री क्षेत्र औदुबंर येथे श्री दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदीर परीसरामध्ये केवळ पुजारी, देवास्थानचे विश्वस्थ, सेवेकरी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जन्मकाळ संपन्न झाल्यानंतर रंगीबेरंगी फुलांनी परिसर फुलुन गेला होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने आज दत्त जयंती निमित्ताने यात्रा उत्सवावर निर्बंद घातले होते. त्यामुळे मंदीर परिसर भाविका विना रिकामा होता.पहाटे ५ पासुन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात पहाठे ५ वा. काकड आरती, ६ वा. मंगल आरती, ७ ते १२ अभिषेक, १२ ते २ महापुजा, महा आरती, तर ४ वा. जन्मकाळाचे किर्तन संपन्न झाले. सांयकाळी ७ वा पालखी सोहळा,श्री दत्त सेवा भावी मंडळ ( ट्रस्ट) च्या वतिने संपुर्ण मंदीर फूलांनी झाकून टाकले होते. त्यामुळे मंदीर परिसर विविध फुलांनी सजले होते. औदुुंबर मध्ये येणारे चारीही रस्ते भाविका विना रिकामे होते. सर्व मार्ग ओसाड पडले होते. लॉकडाऊन नंतर शुकशुकाट पुन्हा अनुभवता आला. गेली ८ दिवस देवास्थान व प्रशासनाच्या वतिने यात्रा उत्सव रद्द करण्याचे घोषणा केली होती. त्यामुळे भाविकांनी औदुंबर कडे फिरवली होती. औदुबंर फाटा या ठिकाणी व औदुंबरला येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुबंर मध्ये वहानांची गर्दी झाली नाही.दुपारी सांगली येथिल श्वान लिओच्या मदतीने मंदीर परिसराची तपासणी केली. यावेळी श्वान लिओ, पी एस आय संभाजी पाटील,व सहकारी पो. हवालदार जयानंद जाधव, तुकाराम लवटे, अवधुत पाटील, श्वान वस्ताद संतोष माळी हे पथक आले होते. औदुंबर फाटा येथे येणा-या भाविकांना आडविले होते. त्यामुळे आलेले काही भाविक मंदीर परीसराच्या जवळ जाण्यास मिळावी यासाठी पोलिस कर्मचारी वर्गाबरोबर हुज्जत घालत होते. मात्र पोलिस कर्मचारी वर्गाने प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत होते.

पोलिसांनी आपले काम काटेकोर पणे केले. तसेच मंदीर परिसरातील व्यापारी लॉकडाऊन नंतर दत्त जयंती उत्सवाला व्यवसाय चांगला होईल या आपेक्षा बाळगुन होते.पण शासनाने ऐन वेळी भाविकांना प्रवेश व संचार बंदी केल्यामुळे व्यावसाय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्गांच्यात थोडा नाराजीचा सुर होता.खा. संजयकाका पाटील, पोलिस उपाधिक्षक अश्विनी शेंडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसिलदार श्रीनिवास ढोणे, सह जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले. भाविकविना किर्तन व पाळणा कार्यक्रम संपन्न झला.अंकलखोप ग्रांमपंचायत वतिने पाण्याची व विजेची व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती. अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते व देवास्थान समितीचे अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सह सर्व सदस्य, भिलवडी पोलिस स्टेशनाचे ए पी आय कैलास कोडग, ए. पी. आय ढेरे, सह ६० पोलिस कर्मचारी होते. पोलिस कर्मचारी यांनी संचारबंदीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवला होता.औदुंबर परिसरात प्रशासनाने संचारबंदी आदेश लागु केला होता. तरी ही अनेक भाविक दर्शनासाठी औदुंबरकडे आले होते. त्यांना दर्शनासाठी सोडत नाहीत. त्यामुळे नाराज झाले होते. काही भाविक म्हणाले की निवडणुकीसाठी प्रचारसभांना लाखो लोकांना परवानगी मिळते. मात्र देव दर्शनाला परवानगी दिली जात नाही. राजकिय लोकांच्या व्यवसायाला संधी. मात्र भाविकांच्या श्रध्देला किंमत नाही. 

 

 

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरSangliसांगली