शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अंधव्यक्तींसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

सांगली : पांढरी काठी टेकत संसाराचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेणाऱ्या जिल्ह्यातील अंधव्यक्तींसमोरही कोरोनाने संकटाचा डोंगर उभा केला आहे. छोटे-छोटे ...

सांगली : पांढरी काठी टेकत संसाराचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेणाऱ्या जिल्ह्यातील अंधव्यक्तींसमोरही कोरोनाने संकटाचा डोंगर उभा केला आहे. छोटे-छोटे व्यवसाय बंद झाले, नोकरी गेली, हाताला कामधंदा नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी पैसे कोठून कमवायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अंधारलेल्या या जीवनात मदतीचा प्रकाश कधीतरी येईल, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.

सांगली जिल्ह्यात जवळपास ७५०हून अधिक अंध व्यक्ती आहेत. त्यातील १५० ते २०० व्यक्ती पूर्णत: अंध आहेत. कोरोनामुळे सर्वच व्यवसाय बंद आहेत. त्यातून अंध व्यक्तींची कुटुंबेही सुटलेल्या नाहीत. कुणाचा झेराॅक्सचा व्यवसाय आहे, तर कुणी ऑर्केस्ट्रामध्ये गाणी म्हणतो, वाद्ये वाजवितो. घरातच छोटी दुकाने थाटून संसाराचा गाडा हाकणारीही अनेक कुटुंबे आहेत. सरकारी व खासगी नोकरी करणाऱ्यांना थोडाफार हातभार लागला आहे. पण अनेकांच्या खासगी नोकऱ्याही कोरोनाने हिरावून घेतल्या आहेत. अशा सर्वच अंध कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम आणि खिशात पैसा नसल्याने लाॅकडाऊनचा एकेक दिवस त्यांचे जीवन अधिकच अंधकारमय करीत आहे.

चौकट

अंध व्यक्तीला पाॅझिटिव्ह होण्याचा धोका अधिक

जिल्ह्यात अंध व्यक्तीला कोरोना झाल्याची माहिती अद्याप नाही. पण या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. कोरोनात फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे, पण डोळ्याने दिसतच नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कसे पालन करणार, हा प्रश्न आहे. शासकीय सेवेतही अनेक अंध व्यक्ती आहेत. पण त्यांना सध्या घरातून काम करण्याची सवलत देण्यात आली आहे.

चौकट

मदतीचा हात

अंध व्यक्तीच्या कुटुंबांना काही समाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. या कुटुंबांना धान्य व किराणा साहित्य देण्यात आले. पण तुटपुंजी मदतही आता संपत आली आहे.

चौकट-

कोट

आधारही एकमेकांचाच

मी पुणे येथे काॅलसेंटरमध्ये काम करीत होतो. लाॅकडाऊनमुळे काॅलसेंटर बंद झाले. त्यामुळे घरी परतावे लागले. सध्या कामाच्या शोधात आहेत. उत्पनानेच कोणतेच साधन नाही. कामाचा शोध घेतोय.

- अर्जुन वाघमोडे

कोट

एका खासगी कंपनीत नोकरी करतो. पत्नी अपंग आहे. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी झेराॅक्स सेंटर सुरू केले, पण लाॅकडाऊनमुळे तेही बंद झाले. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत आहे.

- आनंद कांबळे

कोट

पहिल्या लाटेत नोकरी गेली. त्यानंतर घरीच छोटे किराणा दुकान सुरू केले. आता तेही बंद आहे. पै-पाहुणे, मित्राच्या मदतीवर कसाबसा उदरनिर्वाह सुरू आहे. -

महेश काळगे

कोट

जिल्ह्यातील अनेक अंध व्यक्ती व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन नाही. छोटे व्यवसाय, नोकरी करून ते घर चालवितात. पण कोरोनाने त्यांचे उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले आहे. सामाजिक संघटनांनी थोडाफार मदतीचा हात दिला आहे. त्यांची पेन्शनही लाॅकडाऊनमध्ये मिळाली आहे, पण या कुटुंबांना कायमस्वरूपी मदतीची गरज आहे.

- यशवंत जाधव, उपाध्यक्ष, प्रहार दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटना, सांगली.