शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

‘आपत्कालीन’च्या बैठकीला सांगलीत अनेकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:20 IST

महापालिकेच्या आपत्कालीन नियोजन बैठकीला महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दांडी मारली.

ठळक मुद्देअधिकारी, पदाधिकारी अनुपस्थित : महापालिकेचे नगरसेवक संतप्त; नालेसफाईवरून प्रशासनाचा पंचनामा

सांगली : महापालिकेच्या आपत्कालीन नियोजन बैठकीला महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दांडी मारली. उपायुक्त सुनील पवार यांच्यासह मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. नगरसेवकांनी पुन्हा एकदा चिखलमय रस्ते, क्रॉसपाईप, नालेसफाईवरून प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा करीत आणखी किती बळी घेणार आहात, असा संतप्त सवालही केला.

महापालिकेच्या गत आठवड्यात झालेल्या महासभेत नगरसेवकांनी पावसाळी मुरूम, क्रॉस पाईप व नालेसफाईवरून प्रशासनाला धारेवर धरले होते. महापौर हारुण शिकलगार यांनी आपत्कालीन नियोजनासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही दिली. त्यानुसार सोमवारी ही बैठक पार पडली. पण या बैठकीला खुद्द महापौरांनीच दांडी मारली. त्यांच्यासह आयुक्त रवींद्र खेबूडकर, मिरज उपायुक्त स्मृती पाटील, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते हे गैरहजर राहिले. अखेर उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्याला उपमहापौर विजय घाडगे, शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने, राजेश नाईक, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, गौतम पवार, दिलीप पाटील, शिवराज बोळाज, बाळू गोंधळी, राजू गवळी असे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. चार प्रभागाचे सहायक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक आरोग्याधिकारी व मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, बांधकामचे उपअभियंता सतीश सावंत यांनीही बैठकीला हजेरी लावली होती.

बैठकीत नगरसेवक राजू गवळी यांनी शामरावनगरचा प्रश्न पुन्हा एकदा मांडला. रुक्मिणीनगरमधील घटनेचा संदर्भ देत आणखी किती बळी घेणार आहात, असा संतप्त सवालही केला. प्रशासनाच्या नावाने बोंब मारण्याचे शिल्लक राहिले आहे. रुक्मिणीनगरमध्ये बळी जाऊनही संथ गतीने काम सुरू आहे. औषध फवारणी होत नाही. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. भोबे गटार स्वच्छ करण्याची गरज आहे. आपत्कालीनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावेत, अशी मागणी केली.

उपमहापौर घाडगे म्हणाले की, प्रभाग तीनच्या कार्यक्षेत्रात नालेसफाई सुरू झाली नाही. मुरूमाचा पत्ता नाही. आम्ही गाºहाणे कुणाकडे मांडायचे? असा सवाल केला. शेखर माने म्हणाले की, महापालिकेचे अधिकारी अजूनही सुटीच्या मुडमध्ये आहेत. २००५ च्या महापूरात जीवितहानी झालेली नव्हती; पण आता चिखलमय रस्ते, पाणी टंचाईने नागरिकांचे बळी जात आहेत. अधिकारी व कर्मचाºयांवर वरिष्ठांचे नियंत्रणच राहिलेले नाही.दिलीप पाटील म्हणाले की, सांगलीवाडीतील सांडपाणी नदीत सोडले जात आहे.

गेल्या पाच वर्षापासून मलनिस्सारण केंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी आम्ही करीत आहोत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगन्नाथ ठोकळे यांनी, नालेसफाई, क्रॉस पाईपवरून अधिकाºयांना धारेवर धरले. उपायुक्त पवार यांनी, बांधकाम आणि स्वच्छता विभागाशी समन्वय साधून लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून आपत्कालीन नियोजनाची पूर्तता करावी असे आदेश दिले.उपायुक्तांचा : आधारमहापालिकेचा गेल्या सहा महिन्यातील कारभार पाहिला, तर उपायुक्त सुनील पवार यांचाच आधार आहे. महापालिकेच्या सभा, स्थायी समितीची सभा असो अथवा कोणतीही बैठक असो, उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ती पार पाडली जाते. पदाधिकारी, नगरसेवकांच्या प्रश्नांना उपायुक्तांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र सभा, बैठकांना टाळण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे या बैठकीतही शेखर माने यांनी, आयुक्त खेबूडकर महापालिकेत असून बैठकीला न आल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण