शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:00 IST

पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवनाला बाधा पोहोचली असून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्यावतीने केलेल्या नजर अंदाज पाहणी अहवालानुसार १ लाख १९ हजार ७२४ शेतकऱ्यांचे ६६ हजार ९८.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उसाच्या सर्वाधिक ३५ हजार हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानउसाच्या सर्वाधिक ३५ हजार हेक्टरचा समावेश

सांगली : पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवनाला बाधा पोहोचली असून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्यावतीने केलेल्या नजर अंदाज पाहणी अहवालानुसार १ लाख १९ हजार ७२४ शेतकऱ्यांचे ६६ हजार ९८.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उसाच्या सर्वाधिक ३५ हजार हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.पूरस्थिती आटोक्यात येत असताना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, पुरामुळे पाच तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही शिवारात पाणी असल्याने पंचनाम्यास अडचणी येत असल्या तरी, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. जिल्ह्यात ८५ हजार हेक्टर क्षेत्र उसाचे असून यातील ३५ हजार हेक्टरवरील उसाचे पुरामुळे नुकसान झाले आहे. उसाबरोबरच केळी, सोयाबीन, भात, द्राक्षे या पिकांचेही नुकसान झाले आहे.पूरबाधित क्षेत्रातील शाळा सोमवारपासून पूर्ववत सुरू होतील. अशा परिस्थितीत मुलांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यात यावी. त्यांना स्वच्छ पाणी देण्याबरोबरच शाळेची इमारतही स्वच्छ करून घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली