लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर गेले दहा महिने दादर-पाॅडिचेरी, दादर-तिरुनेलवेल्ली या साप्ताहिक एक्स्प्रेस बंद होत्या. अनलाॅक काळात कोयना, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन यासह अनेक एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र मिरज-पंढरपूर मार्गावरील रेल्वे गाड्यांसह कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-निजामुद्दीन, दादर-पाॅडिचेरी, दादर-तिरुनेलवेल्ली या साप्ताहिक एक्स्प्रेससह पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. दादर-पाॅडिचेरी एक्स्प्रेस दि २१ पासून व पाॅडिचेरी ते दादर एक्स्प्रेस दि २३ पासून सुरू होत आहे. दादर-तिरुनेलवेल्ली या विशेष एक्स्प्रेस दि. २०पासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी व तिरुनेलवेल्ली ते दादर एक्स्प्रेस दि.२२ पासून प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी धावणार आहे. या विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू झाल्याने दक्षिणेत जाण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
दादर-पाॅडिचेरी, तिरुनेलवेल्ली साप्ताहिक एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST