शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘झिरो पेमेंट’ प्रणालीसाठी बेदाणा व्यापारी आग्रही -:पारदर्शकतेसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:09 IST

याचा शेतकरी, व्यापारी, अडते यांना फायदा होतो. दस-यापासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे बंद ठेवून हे व्यवहार पूर्ण केले जातात. देशभरातील व्यापा-यांकडून काही रक्कम येणे बाकी पूर्ण केली जाते.

ठळक मुद्देसर्वच घटकांसाठी निर्णय फायदेशीर

शरद जाधव ।सांगली : संपूर्ण देशात बेदाण्यासाठी सांगलीचीबाजारपेठ अग्रेसर असताना, त्यातील व्यवहारही पारदर्शी व्हावेत यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. वर्षभरातील सर्व व्यवहार पूर्ण व्हावेत व कोणाकडूनही येणे-देणे राहू नये यासाठी गेल्या दहा वर्षापासून झिरो पेमेंट संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाही महिन्यासाठी सौदे बंद असून या कालावधित व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

बेदाण्याची वार्षिक उलाढाल करोडो रूपयांची असल्याने त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकवेळा आपली पत नसतानाही काही व्यापारी मोठ्या प्रमाणावर बेदाणा खरेदी करतात व नंतर पैसे देताना विलंब लावला जातो. तसेच काही व्यापाऱ्यांनी मात्र, बाजारपेठेतील आपली पत कायम राखली आहे. त्यामुळे लाखो रूपयांचे व्यवहार होऊनही पैसे कुठेही अडकत नाहीत. जे व्यापारी व्यवहार पूर्ण करत नाहीत, त्यांच्यावर ‘बॅन’ घातला जातो.

सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून ‘झिरो पेमेंट’ संकल्पना राबविली जाते. त्यानुसार वर्षभर झालेले व्यवहार या कालावधित पूर्ण करावयाचे असतात. याचा शेतकरी, व्यापारी, अडते यांना फायदा होतो. दस-यापासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे बंद ठेवून हे व्यवहार पूर्ण केले जातात. देशभरातील व्यापा-यांकडून काही रक्कम येणे बाकी पूर्ण केली जाते.

बेदाणा व्यवहारात सध्या ३५ ते ४५ दिवसांचा कालावधी असतो. मात्र, इतर ड्रायफ्रूटचा विचार करता, अनेक ठिकाणी रोखीने व्यवहार होत असतात. बेदाण्यासाठीही केवळ आठवड्याची ‘साईड’ देण्याची मागणी नेहमी केली जात आहे, तर बेदाण्याचेही व्यवहार कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी व्यापारी आग्रही आहेत.बेदाण्यातही ‘ड्रायफ्रूट’प्रमाणे व्यवहार आवश्यकगुजरातमधील उंजा या शहरात जिºयाची मोठी बाजारपेठ आहे. हजार ते १५०० रूपये प्रतिकिलो असलेल्या जि-याचे व्यवहार मात्र रोखीने होतात. रोखीने नसले तरी किमान धनादेश देऊनच खरेदी केली जाते. असे व्यवहार होण्यास अडचणी असल्या तरी, बेदाण्याची करोडो रूपयांची उलाढाल असताना पैशासाठी मात्र ४० दिवस थांबावे लागते. त्याऐवजी किमान ड्रायफ्रूटच्या इतर व्यापाराप्रमाणे व्यवहार होण्याची मागणी आहे. ड्रायफ्रूटच असलेल्या काजूच्या व्यवहारात सहाव्या दिवशी व्यवहार पूर्ण केले जातात. 

शेतकरी, व्यापाºयांसह बेदाणा व्यवसायातील सर्व घटकांसाठी झिरो पेमेंट संकल्पना फायदेशीर आहे. मात्र, यंदा झिरो पेमेंट होण्यासाठी व्यापाºयांनी आग्रही राहावे. व्यापाºयांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतल्यास झिरो पेमेंट संकल्पना यशस्वी होणार आहे.- प्रशांत पाटील-मजलेकर, व्यापारी

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार