शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

महापालिकेला बेबनावाचा शाप

By admin | Updated: July 9, 2016 00:54 IST

जयंत पाटील : काँग्रेसमध्ये गोंधळच

सांगली : महापालिका काँग्रेसच्या ताब्यात असतानाही पक्षात बेबनाव आहे. मागच्या सत्ताकाळापासून सत्ताधाऱ्यांना बेबनावाचा शाप लागला आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. एकाच पक्षाची सत्ता असताना इतका गोंधळ सुरू आहे. त्यापेक्षा महाआघाडी बरी, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत असल्याचेही ते म्हणाले. महाआघाडीच्या सत्ताकाळात शेवटच्या वर्षभरात जयंत पाटील व माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला होता. त्याची सल अजूनही जयंतरावांच्या मनात आहे. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी आला. महापालिकेतील सत्ताधारी गटाच्या कारभारावर टीका करताना जयंतरावांनी महाआघाडीच्या शेवटच्या काळात घडलेल्या राजकीय नाट्याचा उल्लेख केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना बेबनावाचा शाप लागला आहे. मागच्या टर्मपासून हा शाप लागला आहे. सांगलीच्या जनतेने काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. पण काँग्रेसमध्येच गोंधळ सुरू आहे. त्यापेक्षा महाआघाडीची सत्ता बरी, असे लोकच म्हणू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला. वारणा पाणी योजनेबाबत ते म्हणाले की, महाआघाडीच्या सत्ताकाळात ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले होते. सत्ता सोडताना या जलशुद्धीकरण केंद्राचे थोडेच काम बाकी होते. ते पूर्ण झाले असते तर सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळाले असते. महाआघाडीच्या काळात पाणी, घरकुल अशा विविध योजना हाती घेतल्या होत्या. या योजना पूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेसला पेललेले नाही. सांगलीच्या विकासासाठी आम्ही कोट्यवधी रुपये आणले. पण ते खर्च करायलाही सत्ताधाऱ्यांना जमले नाही. सत्ता चालविण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)जि. प. अध्यक्ष : निवड सर्वानुमतेजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तासगावला देण्याचा निर्णय आर. आर. पाटील असतानाच घेतला होता. तासगाव तालुक्यातील कोणत्याही इच्छुकाचे नाव आपण घ्यायचे नाही, अशी भूमिका सुरूवातीपासूनच ठेवली होती. हा निर्णय तासगावचाच होता. प्रदेश राष्ट्रवादीने अध्यक्ष निवडीसाठी खास विश्वासू पक्षनिरीक्षक पाठविले होते. त्यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला. आमदार सुमनताई पाटील या नाराज असल्याबद्दल आपणाला काहीच माहिती नाही. आपली त्यांच्याशी भेट झाली नाही. या निवडीवर कोणीच नाराज नसेल. सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत पक्षनिरीक्षकांनी सदस्यांची मते अजमावली आहेत, असेही पाटील म्हणाले.स्वीकृत संचालक निवडी लवकरचजिल्हा बँकेची निवडणूक होऊन वर्ष झाले तरी, अद्याप स्वीकृत संचालकांची निवड झालेली नाही. याबाबत पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेत दोन स्वीकृत संचालक लवकरच निवडले जातील. त्याबाबत अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. आमचा निर्णय जवळपास झाला आहे. बँकेच्या सभेत या निवडी जाहीर होतील, असेही पाटील यांनी सांगितले. शुध्द पाणी कधी?महाआघाडीच्या सत्ताकाळात ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले होते. सत्ता सोडताना या जलशुद्धीकरण केंद्राचे थोडेच काम बाकी होते. ते पूर्ण झाले असते तर सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळाले असते. परंतु, याकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तो प्रकल्प अपूर्ण राहिला, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.