इस्लामपुरातील आंबेडकर चौकामधील शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी लोकांची झुंबड.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात ६० वर्षांवरील काही नागरिकांचा लसीकरणाचा पहिला तर काहींचा दुसरा डोस देण्यात येत आहे. त्यातच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, बहुतांश नागरिकांचा दुसरा डोस होण्याअगोदरच १८ वर्षांवरील लोकांचा डोस सुरू झाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात फक्त ऑनलाधन बुकिंग केलेल्या युवकांचेच लसीकरण केले जाते. तर ज्येष्ठ आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण रिंग रोडवरील आंबेडकर चौकातील शासकीय रुग्णालयात करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे केंद्रावर असलेल्या पोलिसांनी बाहेर येऊन वाहतूक कोंडी आवाक्यात आणली.