शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये प्रेमी युगुलांची गळफास घेवून आत्महत्या, सावर्डे पाठोपाठ कुपवाड हादरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 13:43 IST

कुपवाड : शहरातील कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या नांद्रेकर यांच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलांनी विष प्राशन करून गळफास घेऊन ...

कुपवाड : शहरातील कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या नांद्रेकर यांच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलांनी विष प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.राजू महादेव माळी (वय ३६ रा.खोत मळा, बुधगाव रोड,कुपवाड, मुळ रा. बबलेश्वर,जि.विजापूर) व रीना किरण पार्लेकर (३३, रा. वखारभाग रामलिंग कॉलनी,मिरज) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. घटनास्थळावरून व एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आत्महत्या केलेले प्रेमीयुगल हे कुपवाड औद्योगिक वसाहती मधील एका गारमेंटमध्ये नोकरीस आहेत. यातील मयत माळी हे कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या खोत मळ्यामध्ये राहावयास आहेत. या ठिकाणी सबंधित महिलेची ये-जा असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी असलेल्या नांद्रेकर मळ्यामध्ये ऊसाच्या शेतीमध्ये असणाऱ्या गोठ्यासाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कंपनीमधील काम संपवून दोघेजण शुक्रवारी रात्री एकत्र आले. त्याठिकाणी उसाच्या शेतीमध्ये विष प्राशन करून दोघांनी शेडमधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. शनिवारी सकाळी सबंधित शेतकरी हे गोठ्याकडे आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानी ही घटना त्वरित एमआयडीसी पोलिसांना कळविली. एमआयडीसी स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्या केलेल्या  केलेल्या दोघा प्रेमी युगुलांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत. आत्महत्येने कुपवाड शहर हादरले... तासगाव तालुक्यातील सावर्डे गावात प्रेमी युगुलांची आत्महत्या झाली होती. या घटनेने जिल्हा हादरला होता. या घटनेपाठोपाठ कुपवाड शहरात शनिवारी प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याने शहर हादरले असून शहर परीसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी