शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन संशोधन न करणारे देश नष्ट होतील : विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:42 IST

भविष्यात जे देश नवनवीन संशोधन करणार नाहीत, ते कदाचित नष्ट होतील. नवीन पिढीने चांगले ज्ञान आत्मसात केले तर, भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या नंबरची होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.

ठळक मुद्देनवीन संशोधन न करणारे देश नष्ट होतील : विजय भटकरकुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान

कुंडल : भविष्यात जे देश नवनवीन संशोधन करणार नाहीत, ते कदाचित नष्ट होतील. नवीन पिढीने चांगले ज्ञान आत्मसात केले तर, भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या नंबरची होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी विजय भटकर यांना पुणे विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याहस्ते क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.भटकर म्हणाले, भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. या संस्कृतीने पूर्ण जगाला दिशा दिली आहे. तिचा आजच्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. चांगले ज्ञान आत्मसात करताना अडचणी अनेक येतील; परंतु त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. आज देश तंत्रज्ञानाची अनेक मोठी पावले उचलत आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून होणे आवश्यक आहे.प्रभाकर देशमुख म्हणाले, डॉ. विजय भटकर यांच्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. स्वातंत्र्यापूर्वीच कुंडल परिसर स्वतंत्र झाला होता; कारण येथे इंग्रजांचे नाही, तर स्वातंत्र्यसैनिकांचे राज्य होते. या देशाची संस्कृती ज्ञानावर आधारित असल्याने आज आपण वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत आहोत. अरुण लाड म्हणाले, या व्याख्यानमालेमुळे ह्यक्रांतीह्णने लोकप्रबोधनाचा जागर चालू केला. यातून क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना अपेक्षित असा समाज घडेल, अशी अपेक्षा आहे.यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, अ‍ॅड. प्रकाश लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, अ‍ॅड. सयाजी पाटील, पी. आर. पवार, प्रकाश पाटील, बाळासाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, बाबूराव गुरव, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, सचिन कदम, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटोळे, शामराव नवले, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, छायादेवी पवार, प्रमिलाताई लाड, अलका लाड, सुनंदाताई लाड, अंजली कदम, सरपंच प्रमिला पुजारी, बापूसाहेब जाधव, संजय जाधव, दिलीप जाधव उपस्थित होते.प्रा. नवनाथ गुंड यांनी मानपत्र वाचन केले, जयवंत आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. जी. के. जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :scienceविज्ञानSangliसांगली