इस्लामपूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अशा स्थितीतही राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधील डिप्लोमा विभागाच्या समुपदेशन कक्षामार्फत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन केले.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीत कसे शिकायचे आम्ही? या विषयावर कऱ्हाड येथील निवृत्त प्राध्यापक डॉ. आर. ए. कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत ही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येते. त्यासाठी मनाची सकारात्मकता गरजेची आहे. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी या प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्याच्या महाविद्यालल्याच्या उद्देशाचे कौतुक आहे. या ऑनलाईन व्याख्यानामध्ये एकूण २१७ विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते.
प्रा. अक्षय कुलकर्णी व प्रा. वर्षा नलवडे यांनी व्याख्यान समन्वयक म्हणून काम पाहिले. सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, विश्वस्त प्रा. शामराव पाटील, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. एच. एस. जाधव, डॉ. एल. एम. जुगुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.