शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या जेवणाच्या बिलात लाखोंचा भ्रष्टाचार : अमित शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:29 IST

हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.

ठळक मुद्देन्यायालयात जाणार; अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सांगली : महापुराच्या काळात पूरग्रस्तांना जेवणाचा पुरवठा केल्याची बोगस बिले जोडून महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ६५ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्ट अधिकाºयांना आयुक्तांनी पाठीशी घालू नये, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करू, असा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, पूरग्रस्तांच्या जेवण बिलाबाबत आयुब पटेल यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घेतली असता, त्यात जेवणाच्या बिलात घोळ उघडकीस आला आहे. पूरग्रस्तांना महापालिकेने जेवण दिल्याचा दावा केला जात आहे. पण त्यासाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनीच पूरग्रस्तांना जेवण दिले होते. तरी देखील ६५ लाखांचा खर्च जेवणावर दाखविला आहे. सध्या काही बिले आम्हाला माहिती अधिकारात दिली आहेत. त्यात बोगसगिरी दिसून येते. जेवणाचा पुरवठा करणाºया केटरर्सच्या लेटरहेडवर पत्ता, मोबाईल नंबर नाही. त्यांचा जीएसटी नंबरही दिसून येत नाही.

बिलाची आकडेवारी पाहता, दहा लाखांचा जीएसटी या केटरर्सनी बुडविला आहे. सर्व बिलांवर एकसारखेच शिक्के आहेत. काहींचा व्यवसाय पुरामुळे बंद आहे. तरी देखील त्यांची बिले जोडली आहेत. केटरर्सनी तीन लाख, सहा लाखाची बिले दिली आहेत. पण अंकात मात्र दहा लाखांची तफावत आहे. त्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी जीएसटी अधिकारी, अन्न व औषध प्रशासनकडे करणार आहोत.

महापालिकेतील सत्ताधाºयांनी पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला मारला आहे. हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.यावेळी आयुब पटेल, जयंत जाधव, महालिंग हेगडे, सुधीर नवले, राजेंद्र पाटील, रमेश डफळापुरे, बापू कोळेकर, मयूर लोखंडे, बाबासाहेब पुणेकर आदी उपस्थित होते.‘आरएसएस’ने जाहीर खुलासा करावापूरग्रस्तांच्या पुनर्वसन केंद्रामध्ये आरएसएसने जेवणाचा पुरवठा केला असल्याची जाहिरात भाजपने केली होती. दुसरीकडे या केंद्रात महापालिकेने पूरग्रस्तांसाठी जेवण दिल्याचे सांगून बिले अदा केली आहेत. मग महापालिकेचे अधिकारी खोटे बोलतात, की आरएसएस? याबाबत आता नागरिकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे आरएसएसने याबाबतचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हान अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी