शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी दूध संस्थातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार- राधाकृष्ण विखे पाटील 

By संतोष भिसे | Updated: September 26, 2022 22:53 IST

जिल्ह्यातील लम्पीग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते  पत्रकारांशी बोलत होते.

सांगली :  सहकारी दूध संघाच्या भ्रष्टाचाराची चौकशी आवश्यक आहे.  80  टक्के दूध व्यवसाय सहकारी संस्थांकडे होता. त्या बंद पडल्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांना भोगायला लागू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे मत महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील लम्पीग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.  विखे -पाटील म्हणाले, "महानंद दूध संस्था तोट्यामुळे राष्ट्रीय डेअरी बोर्डकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध व्यवसायातील स्पर्धेपासून दूर पळता येणार नाही. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन करण्याबाबत धोरण राबवू."

लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुमारे 84 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात हा आजार नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून राज्य शासनाकडून अधिकाधिक जनावरांना वेळेत आणि वेगवान पद्धतीने लसीकरण करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले.  पशुवैद्यकीय क्षेत्रातील रिक्त जागा लवकर भरण्याबाबत शासन विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या आजाराच्या काळात खासगी डॉक्टर आणि पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले,  त्यांच्या मानधनाविषयीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.ते म्हणाले,  गोहत्या बंदी आणि लंम्पी स्किन आजार याचा संबंध नाही.  मोकाट जनावरे, गोशाळा, पांजरपोळ येथेही लसीकरण  शंभर टक्के आहे. नगरपालिका क्षेत्रातदेखील लसीकरणाचे आदेश दिले आहेत.

पाटील म्हणाले,  " काँग्रेसला देशात नेतृत्व राहिलेले नाही. राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना जी काही अवस्था सुरू आहे, ती पाहता त्या पक्षात राहावे असे कोणाला वाटेल. भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे वैश्विक नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्याबाबत योग्यवेळी  निर्णय घेतले जातील.  राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा सध्या पक्षाचे काँग्रेस छोडो सुरू आहे त्यावर काम करणे गरजेचे आहे. तसेच, पाटील म्हणाले, मॉल आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल. यावेळी प्रांताधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार दगडू कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील