शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

सत्ताधाऱ्यांचा सर्व पक्षांसोबत भ्रष्टाचार

By admin | Updated: March 22, 2017 23:37 IST

मेधा पाटकर : वाळव्यात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

वाळवा : सहकाराला खासगीकरणाकडे नेण्याचा मार्ग महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी बनवला आहे. त्यातील काहीजण आज तुरुंगात आहेत. सर्व पक्षांना सत्तेत सामावून घेऊन भ्रष्टाचार करायचा, असाच यांचा पवित्रा असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बुधवारी केले. भ्रष्टाचारमुक्त संस्था चालविणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. राजकीय मूल्यहीनतेची तत्त्वे देशाच्या मानगुटीवर बसली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यासह अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, संकुलाच्या मार्गदर्शिका व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या पत्नी कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पाटकर म्हणाल्या की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची जमीन विक्री राजकीय खरेदीदारांनीच केली आहे, परंतु क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांनी सहकारी तत्त्वाला कोठेही भगदाड पडू नये, याची जाणीव ठेवूनच हुतात्मा कारखान्याची उभारणी केली आहे. ‘हुतात्मा’ची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. जेथे ऊस पिकत नाही, तेथे साखर कारखाने आणि त्याद्वारे भूजल हडप करणे, याला आमचा कायमचा विरोध राहील.भाई वैद्य म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीनंतर घटनेवर हल्ला करून देशाला यादवी युध्दाकडे नेले जात आहे. भाजप, नरेंद्र मोदी सत्तेवर नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेवर आला आहे. त्यांनी प्रारंभापासूनच घटनेला विरोध केला आहे. २०२४ नंतर पुढे निवडणुका होणार नाहीत, तर लष्कराच्या साहाय्याने हिटलरशाही सुरू होईल. त्यासाठी राजकारणाचा पट बदलून नव्याने मांडावा लागेल. सर्व पक्षांनी वास्तवतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करीत असताना ज्यांच्या पोटातील पाणीसुध्दा हालत नाही, ते श्रमजीवी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. शेतकरी संघटनेचे नेते म्हणवून घेणारे आता सरकारजमा झाले आहेत. वैभव नायकवडी व सौ. नंदिनी नायकवडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या विस्तारीकरण बांधकामाचा प्रारंभ मेधा पाटकर व भाई वैद्य यांच्याहस्ते करण्यात आला. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. प्रा. राजा माळगी, प्रा. डॉ. जे. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)व्यवस्था : विषमतेवर आधारितमेधा पाटकर म्हणाल्या की, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी येणे म्हणजे जातीयवादाचे, धर्मांध शक्तींचे उफाळून येणे होय. ३५ लाख कोटीच्या घरातील भांडवलदारांना सूट मिळते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी विषमतेवर आधारित व्यवस्था उलटून टाकली पाहिजे. ३१ वर्षे लढून सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे मिटलेले नाहीत. धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न हिणवून चालणार नाही.वाळवा येथे बुधवारी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मृतिदिनानिमित्त जाहीर सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, अरूण लाड, वैभव नायकवडी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भाई वैद्य, कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव उपस्थित होते.