शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सांगलीतील शिवप्रतिष्ठानची रॅली रद्द; 'कोरोना'चा संभाजी भिडेंनाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 12:08 IST

गेल्या 35 वर्षांपासून संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथून ही रॅली काढण्यात येत असते.

सांगली :कोरोना साथीची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील आकडा शनिवारी सर्वाधिक होऊन ३१ पर्यंत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रतिबंधक उपायही अधिक कडक केले. त्यानुसार राज्यातील यात्रा, शासकीय कार्यक्रम आणि गर्दी होईल अशा कार्यक्रमांना परवानगी ने देण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचा फटका शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना सुद्धा बसला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत निघणारी शिवप्रतिष्ठानची रॅली रद्द करण्यात आली आहे. गेल्या 35 वर्षांपासून संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथून ही रॅली काढण्यात येत असते. यावेळी मोठ्याप्रमाणावर तरुणाचा सहभाग पाहायला मिळतो. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता आणि प्रशासनाला सहकार्य म्हणून ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे समन्वयक नितीन चौगुले यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या रॅलीचे नेतृत्व संभाजी भिडे हे करत असतात. 

चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनानं जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 156,396 कोरोना व्हायरसनं संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले असून, त्यात चीनमध्ये जवळपास 80955 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. त्याच्या खालोखाल इटलीमध्ये 21,157 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जगात कोरोना संक्रमित 5833 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात 3085 मृत्यूचा आकडा एकट्या चीनमधला आहे.