शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

CoronaVirus In Sangali: इस्लामपुरात एकाच कुटुंबातील ११ कोरोनाग्रस्त; संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 22:27 IST

Coronavirus: आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्या पेठवडगावमधील महिलेलाही लागण

सांगली: इस्लामपुरातील कोरोनाग्रस्त कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. तर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या पेठवडगावमधील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. या तिघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबियातील हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्च रोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितले होते. या कुटुंबात ३५ सदस्य असून हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. यानंतर बॅरिकेटस लावून तो बंदिस्तदेखील करण्यात आला. बुधवारी सकाळी आणखी पाच जणांचा अहवाल मिळाला. तो पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा खळबळ उडाली. गुरुवारी रात्री या कुटुंबातील आणखी दोघांचे अहवाल आले. ते पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील एका महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे.इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील अकरा जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर मिरजेच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक मंगळवारपासून सक्रिय झाले आहे. रुग्ण शोधण्याचे आव्हान या पथकापुढे आहे. एकाच घरातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याने इस्लामपूर शहरात घबराट पसरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस