शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा बॅँक उभारणार  : अमित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:09 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत व आधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचीही चाचणी सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्या झालेल्या रुग्णातील प्लाझ्मा संकलनासाठी सर्वत्र प्लाझ्मा बॅँक स्थापण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्देकोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा बॅँक उभारणार  : अमित देशमुखसांगली,मिरज रूग्णालयाच्या विस्तारणीकरणास प्राधान्य

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत व आधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचीही चाचणी सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्या झालेल्या रुग्णातील प्लाझ्मा संकलनासाठी सर्वत्र प्लाझ्मा बॅँक स्थापण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री देशमुख म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने कोरोनावर अत्याधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब करण्यात येत असून जगभरात प्रभावी ठरलेल्या प्लाझ्मा थेरपीच्याही चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित अत्यवस्थ रूग्णांवर या पध्दतीने उपचार प्रभावी ठरतो. त्यामुळे सर्वत्र प्लाझ्मा बॅँक तयार करण्यात येणार आहेत. बºया झालेल्या रुग्णाच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीनेच ही व्यवस्था करण्यात येणार आहे.सांगली जिल्ह्यातही सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या अधिक असलीतरी त्यानंतरची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या उपाययोजनांची सर्वात प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रूग्णदर व मृत्यूदर कमी आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या ५० वर्षावरील सर्वांची यादी तयार असल्याने कोरोना नियंत्रणासाठी मदत होणार आहे.नॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठीही प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयातही सुरक्षाविषयक पीपीई किटसह इतर साधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नॉन कोविड रुग्णांवर उपचारात अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती देशमुख यांनी दिली.कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात अस्वस्थता असते. ती दूर करण्यासाठी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी व्हिडीओ कॉलव्दारे संवाद साधण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईकालाही दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठीही प्रशासनाने नियोजन करावेनॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठीही प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयातही सुरक्षाविषयक पीपीई किटसह इतर साधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नॉन कोविड रुग्णांवर उपचारात अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती देशमुख यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीAmit Deshmukhअमित देशमुख