शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मणदूर परिसर बनला कोरोनाचा हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:26 IST

शिराळा तालुक्यातील मणदूर गाव कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला आहे. मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. या गावात ३०, तसेच येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने सोनवडे-काळोखेवाडी येथील दोन नातेवाईक, असे ३२ रुग्ण बाधित आहेत. एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमणदूर परिसर बनला कोरोनाचा हॉट स्पॉटमुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे रुग्णवाढ

विकास शहा शिराळा : शिराळा तालुक्यातील मणदूर गाव कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला आहे. मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. या गावात ३०, तसेच येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने सोनवडे-काळोखेवाडी येथील दोन नातेवाईक, असे ३२ रुग्ण बाधित आहेत. एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.मणदूर गावाची लोकसंख्या १६४४ असून ३३४ कुटुंबे आहेत. मुंबईहून गावात सुमारे ६०० नागरिक आले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन केले होते. मात्र, त्यांचा गावातील अनेक नागरिकांशी संपर्क आला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दोनवेळा गावास भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम दररोज गावास भेट देत असून, कामकाजावर नियंत्रण ठेवून आहेत. आरोग्य विभागाकडून डॉ. एम. आर. परब, डॉ. एन. जे. गवार, डॉ. पिनातपाणी चिवटे यांच्यासह पथक कार्यरत आहे.दररोज सकाळी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेणे, एखाद्यात कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या घशातील स्रावांचे नमुने घेतले जात आहेत. ५० वर्षावरील ३७८ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी केली जात आहे. कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना अन्नधान्य व औषधे घरपोच दिली जात आहेत.आजअखेर १९८ नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे येथे कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी वर्गाची चहा, नाष्टा, जेवणाची सोय केली आहे.पहिला रुग्ण ३१ मे रोजी सापडला आणि यानंतर सतत रुग्णांत वाढ होत आहे. २७ नागरिकांना मणदूर येथील जिल्हा परिषद शाळेत, तर १३ नागरिकांना शिराळा येथे संस्था क्वारंटाईन केले आहे. गुरुवारच्या सहा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली