शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : सांगलीचे व्यापारी बंडाच्या पावित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:07 IST

राज्य शासनाने रेड झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत बाजारपेठेतील १०० टक्के दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही तर सोमवारनंतर व्यापारी स्वत:हून दुकाने उघडतील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी गुरुवारी दिला.

ठळक मुद्देसांगलीचे व्यापारी बंडाच्या पावित्र्यातसोमवारपर्यंतची डेडलाईन : दुकाने सुरू करणार

सांगली : राज्य शासनाने रेड झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत बाजारपेठेतील १०० टक्के दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही तर सोमवारनंतर व्यापारी स्वत:हून दुकाने उघडतील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी गुरुवारी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री, स्थानिक आमदार, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यापाºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. शहा म्हणाले की, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगरसह विविध शहरातील व्यापारपेठा सुरू झाल्या आहेत. पण सांगलीतील बाजारपेठ सुरू करण्यास मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

प्रशासनाला केवळ बाजारपेठेत गर्दी दिसते का? सध्या रस्त्यावर लोक गर्दी करून आहेत. जी दुकाने उघडली आहेत तिथेही गर्दी आहे. मग त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होत नाही का? असा सवालही त्यांनी केला. शहरातील व्यापाऱ्यांची अवस्था बिकट आहे.

किमान सवलत मिळाल्यास घरखर्च आणि कामगारांचे पगार देता येतील. इतर शहरात दुकाने सुरू करण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्या आदेशाची प्रतही प्रशासनाला दिली. पण त्यावर साधी चर्चा करण्याचीही त्यांची तयारी नाही.

बाजारपेठा न उघडण्यामागे काही राजकारण आहे का? जिल्ह्याचे अर्थकारण रुळावर आणण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. पण ती ते पार पाडत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. येत्या तीन दिवसात जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्याबाबत निर्णय न घेतल्यास सोमवारनंतर व्यापारी दुकाने उघडतील. प्रशासनाने अवश्य गुन्हे दाखल करावेत, असेही आव्हानही त्यांनी दिले. 

व्यापाऱ्यांना वाली कोण? शहरातील व्यापाऱ्यांना कोणीच वाली नाही. स्थानिक आमदार, खासदार लक्ष देण्यास तयार नाही. पालकमंत्री व इतर राजकीय पक्षांचे नेत्यांकडे वेळ नाही. जिल्हा प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.- समीर शहा, अध्यक्ष,व्यापारी एकता असोसिएशन

 

संघटनेची मागणी

  •  शंभर टक्के दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी
  • व्यापाºयांच्या कर्जावरील एक वर्षाचे व्याज माफ करावे
  • कर्जाचे हप्ते भरण्यासाठी एक वर्षाची मुदत द्यावी
  • व्यवसायिक घरपट्टी, पाणीपट्टी, विजबील माफ करावे
  • राज्यात रेडझोनमध्येही दुकाने सुरू आहेत, मग सांगलीत का नाही? याचे उत्तर द्यावे
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली