शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : सांगलीची बाजारपेठ पुन्हा गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:00 IST

सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली गर्दी आज पहायला मिळाली नाही.

ठळक मुद्देसांगलीची बाजारपेठ पुन्हा गजबजलीदुकानासमोर शिस्तीचे दर्शन : ग्राहकांची गर्दी

सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली गर्दी आज पहायला मिळाली नाही. दुपारनंतर ग्राहकांची गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. गणपती पेठेत मात्र दिवसभर रेलचेल होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती.तब्बल दीड महिन्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पूर्णपणे उघडली होती. तसे गत सोमवारपासूनच बाजारपेठेतील दुकाने उघडण्यास सुरूवात झाली होती. जिल्हा प्रशासन व महापालिकेने एक दिवसाआड एका बाजूची दुकाने उघडण्यास परवागनी दिली होती.

तेव्हा पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. बहुतांश दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला होता. नागरिकांच्या बेशिस्तीमुळे बाजारपेठेत वाहतुकीचीही कोंडी झाली होती.आता शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून संपूर्ण बाजारपेठ एकाच वेळी उघडण्यास परवानगी देण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंतच बाजारपेठ सुरू राहणार असल्याने सकाळपासून व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली होती. हरभट रोड, गणपती पेठ, कापडपेठ, मेन रोड, सराफ कट्टा, दत्त-मारुती रोड, स्टेशन रोडसह विविध भागात दहा वाजेपर्यंत पूर्ण बाजारपेठेतील दुकाने उघडली होती.

दुकानात प्रवेश करताना ग्राहकांना सॅनिटायझरही दिले जात होते. तसेच अनेक दुकानासमोर चौकोनी पट्टेही मारण्यात आले होते. शासनाच्या नियमांचे बºयाच दुकानदारांनी पालन केले होते.गेली चार दिवस बाजारपेठेतील दुकाने खुली झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी गर्दी होती. कापड, भांडी, मोबाईल दुकानात मात्र गर्दी होती. सराफ पेठेतही ग्राहकांची गर्दी कमीच होती. काही मोजक्याच सराफी दुकानात ग्राहक दिसत होते.

गणपती पेठेत मात्र मालाची आवक-जावक मोठ्या प्रमाणात होत होती. ट्रक व इतर वाहनातून दुकानात माल उतरविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती.हातगाडी, फळ विक्रेत्यांना बंदीबाजारपेठा खुल्या झाल्या असल्या तरी दुकानासमोर हातगाडी, फळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यातून काही ठिकाणी हातगाड्यावर मालाची विक्री सुरू होती. तर फळ विक्रेत्यांनी दुकानासमोर ठाण मांडले होते.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी बाजारपेठेत फिरत होती. हातगाडीवरील व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही ध्वनीक्षेपकांवरून दिल्या जात होत्या. महापालिकेची गाडी आल्यानंतर काहीजणांनी हातगाडी, फळांच्या टोपल्या हलविल्या. पण गाडी पुढे जाताच पुन्हा रस्त्यावर ठाण मांडले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीMarketबाजार