शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये घरोघरी बल्लवाचार्यांची पाकसिद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:28 IST

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या फुरसतीमध्ये घरोघरी खवय्येगिरी उफाळून येत आहे. हॉटेल्स आणि बेकऱ्या बंद असल्याच्या काळात घरातच वेगवेगळे मेनू तयार होत आहेत. यू-ट्यूबवरून रेसिपींचे अनुकरण करत दररोज काहीतरी हटके आयटम किचनमध्ये तयार होत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये घरोघरी बल्लवाचार्यांची पाकसिद्धीयू-ट्यूबवरून प्रशिक्षण; नवा दिवस-नवा मेनूू

सांगली : लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या फुरसतीमध्ये घरोघरी खवय्येगिरी उफाळून येत आहे. हॉटेल्स आणि बेकऱ्या बंद असल्याच्या काळात घरातच वेगवेगळे मेनू तयार होत आहेत. यू-ट्यूबवरून रेसिपींचे अनुकरण करत दररोज काहीतरी हटके आयटम किचनमध्ये तयार होत आहेत.एरवी सुटीच्यादिवशी हॉटेलिंग करणे किंवा बाहेरून पदार्थ मागवणे, हा ठरलेला शिरस्ता आहे; पण सध्या लॉकडाऊनमुळे मिळालेली सुटी भलतीच दीर्घ ठरली आहे. या काळात हॉटेल्सही बंद आहेत आणि बेकऱ्यादेखील. घरबसल्या दुसरा उद्योगही नाही. मग हाताला येतो मोबाईल आणि यू-ट्यूब. अनेक शाकाहारी आणि मांसाहारी रेसिपी यू-ट्यूबवरून साकारल्या जात आहेत. त्यासाठी बेकरीमधून साहित्य उपलब्ध केले जात आहे.

विशेषत: पिझ्झा बेस, पावभाजीचा पाव, वड्यासाठीचे छोटे पाव, मिसळसाठी पावाच्या लाद्या यांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. बेकऱ्यांनी रेडी टू इट बंद केले आहेत. फक्त पार्सल सुरू आहे. त्यामुळे बेकरीतून साहित्य नेऊन घरातच पदार्थ बनविण्याकडे कल आहे. सँडविच ब्रेड, मिल्क ब्रेड, बटर खारी, टोस्ट, ड्राय केक हे नेण्यासाठी बेकरीमध्ये गर्दी होत आहे. अंडी, रोल्स, विविध फ्लेवर्स यांनाही मागणी आहे.  पाणीपुरी, भेळ, मिसळ, डोसा, उत्ताप्पा हे एरवी सांगलीच्या चौपाट्यांवर मिळणारे पदार्थ, पण आता घरोघरी किचनमध्येच त्यांचे बेत केले जात आहेत. त्यासाठीही बेकरीमधून साहित्याला मागणी आहे.

चिकन-मटण दुकाने बंद असल्याने मांसाहारी मेनूला फाटा मिळालाय, पण अंड्याच्या रेसिपी जोरात आहेत. कोरोनामुळे अंडी स्वस्त झाल्याचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. बुर्जी, आॅम्लेट, सॅण्डविच असे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या रेसिपी किचनमध्ये साकारत आहेत.केक मिळणार नाहीवाढदिवसाचे केक तयार करणे बेकरी चालकांनी बंद केले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी गर्दी होते आणि त्यातून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होते. हे लक्षात घेऊन केक तयार करणे बंद केल्याची माहिती बेकरीचालक संघटनेचे खजिनदार नावेद मुजावर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReceipeपाककृतीSangliसांगली