शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : आरोग्य विषयक हेल्पलाईनचा अनेकांना होतोय लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:36 IST

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि आयएमए सांगली व मिरज मार्फत हेल्पलाईन क्रमांक 9821808809 सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्याशी निगडीत अनेकांचे शंका, समाधान होत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विषयक हेल्पलाईनचा अनेकांना होतोय लाभहेल्पलाईन १२ तास चालू

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय व्यवसायीकांकडे जाण्यासाठी अनेकदा अडचणीचे येते. अशा स्थितीत त्यांना तातडीची मदत व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि आयएमए सांगली व मिरज मार्फत हेल्पलाईन क्रमांक 9821808809 सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्याशी निगडीत अनेकांचे शंका, समाधान होत आहे.याबाबत आयएमए सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजीतसिंह जाधव म्हणाले, या हेल्पलाईनवर सांगली, मिरज येथील एमडी तज्ज्ञ डॉक्टर सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत उपस्थित असतात. ही हेल्पलाईन १२ तास चालू असते.

हेल्पलाईन क्रमांकावर दररोज २० ते २५ कॉल येतात. विचारलेल्या आरोग्यांच्या तक्रांरीवर या ठिकाणी उपलब्ध असणारे डॉक्टर मार्गदर्शन करतात. काही वेळा आरोग्य विषयक समस्या शिवाय ही अन्य बाबीबाबत माहिती विचारणारे कॉलही येतात.

याबाबत संबंधितांना ते फॉरवर्ड करून शंका, समाधान केले जात आहे. सोशल मीडियावरून कोविड-19 च्या अनुषंगाने बरीच माहिती आपल्याकडे गोळा झालेली असते. ही माहिती खरी आहे की खोटी आहे याची कल्पना आपल्याला नसते व मनात गोंधळ निर्माण होतो.

हा गोंधळ दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबर वर फोन करून विचारू शकता. जर आपल्याला घरामध्ये किंवा घराच्या आसपास लागण झोलेली व्यक्ती किंवा तशी लक्षणे दिसत असल्यास त्याबद्दल काही शंका असल्यास हेल्पलाईनवर संपर्क करू शकता. तसेच अशा प्रकारचे रूग्ण कोणत्या दवाखान्यामध्ये पाठवायचे याबद्दलही माहिती विचारू शकता. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली