शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कर्नाटक सरकारची मुजोरी, आपल्याच राज्यातील मजुरांना ठेवलेय 21 तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:11 IST

शासनाचा ई पास असूनसुध्दा सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून दीड महिन्याच्या लहान लेकराला घेऊन बाळंतीण महिला म्हैसाळ येथील कर्नाटक सीमेरेषवर आपल्या गावी जाण्यासाठी तब्बल 21 तासापासून प्रतिक्षा करत आहे.

ठळक मुद्देई-पास घेऊनसुध्दा आपल्याच राज्यातील मजुरांना कर्नाटक पोलीस घेत नाहीत21 तासापासून मजूर व दीड महिन्याचे बाळ घेऊन बाळंतीण महिला करतेय गावी जाण्याची प्रतिक्षा

सुशांत घोरपडेम्हैसाळ (जि. सांगली)  : शासनाचा ई पास असूनसुध्दा सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून दीड महिन्याच्या लहान लेकराला घेऊन बाळंतीण महिला म्हैसाळ येथील कर्नाटक सीमेरेषवर आपल्या गावी जाण्यासाठी तब्बल 21 तासापासून प्रतिक्षा करत आहे.कर्नाटक राज्यातील अनेक मजूर आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागात मजुरी करतात. लॉकडाऊन सुरू असताना शासनाच्या नियमानुसार मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी ई पास देण्याची सोय आहे. त्यानुसार अनेक मजूर नियमानुसार ई पास घेऊन प्रवास करत आहेत. पण ई पास असूनही कर्नाटक पोलीस या मजूरांना कर्नाटकात प्रवेश देत नाहीत.

उलट ते या मजुरांना निपाणीमार्गे कर्नाटकात जा, असा सल्ला देत आहेत. म्हैसाळच्या कर्नाटक सीमारेषेपासून निपाणी 110 किलोमीटरवर आहे. पण त्यामार्गे जाण्यासाठी या मजुरांकडे पैसै नाहीत. कालपासून सर्वजण उपाशी आहेत. लहान बाळांना दूध नाही. काल पूर्ण रात्र मजुरांनी ट्रँक्टरमध्ये काढली.

लहान दीड महिन्याच्या लेकराला घेऊन बाळंत महिलेने पूर्ण रात्र टाटा सुमो या गाडीत काढली. काही जणांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र व परवाना आहे. त्यांची सुध्दा अडवणूक केली आहे. लष्करातील एक जवान त्याच्या कुटुंबासोबत कालपासून रस्त्यावर उभा आहे. आम्हाला सोडायचे नव्हते तर आम्हाला सरकारने परवानगीच का दिली, असे प्रश्न हे मजूर विचारत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीKarnatakकर्नाटक