शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये बदल ;पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:35 IST

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याने, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये बदल ;पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक : अभिजित चौधरी बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढल्याने अधिक काळजी

सांगली : परजिल्ह्यांतून व परराज्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. बाहेरून येणाऱ्यांचे जिल्ह्यात स्वागतच असले तरी, त्यांनी रितसर आपली तपासणी करून घेऊन यावे. तसेच क्वारंटाईनचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तरीही अनेकजण त्याचे पालन करत नाहीत.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याने, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्­र्वभूमीवर प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असली तरी, यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाने आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिवाय होम क्वारंटाईनचे पालन करावे. क्वारंटाईनचे जे पालन करणार नाहीत, त्यांना थेट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस अधिक आव्हानात्मक असल्याने, गरज असेल तरच बाहेर पडा. तसेच मास्कचा वापर, वारंवार हात धुण्यासह नियमांचे पालन करावे.राज्य शासनाच्या निर्देशानुसार उद्या, शुक्रवारपासून लॉकडाऊनमध्येही काही बदल होत आहेत. यापूर्वी रेड,आॅरेंज, ग्रीन असे तीन झोन होते, आता दोनच झोन असणार आहेत. त्यात सांगलीचा नॉनरेड झोनमध्ये समावेश आहे. सध्या बंद असलेली दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय जिल्हांतर्गत बससेवाही सुरू करण्यात येणार आहे. बससेवा सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असणार आहे.तसेच खुल्या मैदानावर गर्दी न करता व्यायाम करण्यास परवानगी असणार आहे. विवाहास ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधीलाही ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.पान दुकाने सुरू, पण पार्सल सेवाचजिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शुक्रवारपासून जिल्ह्यातील पान दुकाने सुरू करण्यासही परवानगी असेल. मात्र, केवळ पार्सल सेवाच पुरविण्याची असून, ग्राहक जर तिथेच पान खाऊन थुंकल्याचे निदर्शनास आले, तर दुकान बंद करण्याची कारवाई करण्याबरोबरच त्या व्यक्तीलाही ५०० रूपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे पान दुकानदारांनी केवळ पार्सल सेवा पुरवावी.परस्पर निर्णय नकोतअनेक गावात परस्पर गावातील रस्ते बंद करण्यासह लॉकडाऊन पाळण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून यामुळे अडवणूक होत आहे. असे परस्पर निर्णय घेणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली