शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : निवारा केंद्रातील सुविधांवर लाभार्थी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:45 IST

रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी लॉकडाऊनच्या या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत 78 निवारागृहामधून 30 हजार 109 गरीब, गरजवंतांना आधार मिळाला आहे. त्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देनिवारा केंद्रातील सुविधांवर लाभार्थी समाधानी78 निवारागृहामध्ये सद्यस्थितीत 30 हजाराहून अधिक गरजू

सांगली : रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी लॉकडाऊनच्या या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत 78 निवारागृहामधून 30 हजार 109 गरीब, गरजवंतांना आधार मिळाला आहे. त्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.आष्टा येथे सुरू असलेल्या निवारा गृहामध्ये सद्यस्थितीत ७२ जण असून यामध्ये तामिळनाडू राज्यातील 50, मध्यप्रदेश 9, राजस्थान 7, उत्तरप्रदेश 2, बिहार 1 तसेच पुणे, मुंबई व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 72 जण निवारा केंद्रामध्ये आहेत. निवारा केंद्रामधून देण्यात येत असलेल्या सुविधाबद्दल लाभार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

या निवारा केंद्रात वास्तव्यास असलेले तरूण लिजवान म्हणाले, म्हैसूर येथून दोघेजण उत्तरप्रदेशकडे गावी जात असताना आम्हाला थांबवून आष्टा येथील निवारा केंद्रामध्ये आणण्यात आले. या निवारा केंद्रामध्ये जेवणाबरोबरच अन्य सुविधा चांगल्या मिळत आहेत. डॉक्टर वारंवार येवून तपासणी करत असतात. त्याचबरोबर राष्ट्रगीत व खेळही घेतले जातात. येथील सर्व स्टाफही चांगला आहे, त्यामुळे आम्हाला येथे कोणतेच टेन्शन नाही. तर याच निवारागृहात असणारे हबीब म्हणाले, निवारा केंद्रामध्ये तीन वेळचे जेवण मिळत आहे. खेळाचीही सुविधा आहे. डॉक्टर येवून तपासणी करून जातात. येथे कोणतीही समस्या नाही सर्व लोक ठिक आहेत.निवारागृहातील नागरिकांना अन्न व इतर जीवनोउपयोगी वस्तुंचा पुरवठा सुरळीत केला जातोच. पण याबरोबरच घरापासून लांब राहिल्यामुळे या नागरिकांच्या मनावर येणारा ताण कमी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून बैठे खेळ, गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची, प्राणायाम यासारखे विविध उपक्रम समुपदेशका मार्फत राबविण्यात येतात. घरापासून लांब राहून मानसिक खच्चीकरण झालेल्या या लोकांमध्ये आनंदाची व उल्हासाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच संकटाच्या स्थितीत धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ९ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून १२९९ लोकांना २५९८ भोजन थाळींचा लाभ देण्यात येत असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली