शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : विद्यार्थी घरी परतले, नोकरदारांचे जेवणाविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:29 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थी घरी परतले, नोकरदारांचे जेवणाविना हालबँकिंग क्षेत्रात नोकरदारांना सहकाऱ्यांनी मदतीचा हात

सांगली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.सांगली शहर हे शैक्षणिक नगरी म्हणून ओळखले जाते, तर मिरज हे मेडिकल हब आहे. शहरातील अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी देश-विदेशातून विद्यार्थी येतात. वालचंद अभियांत्रिकीसारखे जागतिक दर्जाचे महाविद्यालयही सांगलीत आहे. शहरात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी वसतिगृहे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्च रोजीच राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात अजून देशभर लॉकडाऊन लागू झालेले नव्हते. त्यातच बारावीच्या परीक्षा संपल्याने ते विद्यार्थी घरी गेले. महाविद्यालयांनाही सुटी दिल्याने व सर्वच परीक्षा पुढे ढकलल्याने उर्वरित विद्यार्थ्यांनी घर गाठले.

शहरातील जैन बोर्डिंग, कळंत्रेअक्का महिला वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी गेले आहेत, तर लिंगायत बोर्डिंगमध्ये ९० पैकी केवळ जिल्ह्याबाहेरील तीन विद्यार्थी आहेत. त्यांना घरगुती खानावळीमधून जेवण दिले जात आहे. अशीच काहीशी स्थिती सर्वच वसतिगृहांची आहे. देशभरात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थी घरी परतल्याने वसतिगृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.लॉकडाऊननंतर उद्योग, बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचे मात्र हाल होत आहेत. हॉटेल्स, खानावळी बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. देशाच्या विविध प्रांतातून हजारो तरूण नोकरीसाठी शहरात स्थिरावले आहेत. यापैकी काही कारखानदारांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांना कारखान्याच्या आवारातच राहण्याची सक्तीही केली आहे, पण काहींचे मात्र हाल होत आहेत. बँकिंग क्षेत्रात बाहेरील राज्यांतून आलेल्या नोकरदारांना सहकाऱ्यांनी मदतीचा हात दिला असला तरी, त्यांची मोठी कसरत होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली