शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील उद्योजकांच्या लॉकडाऊन शिथिलतेकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:31 IST

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंडावली आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांना घरघर लागली आहे. अडचणीत सापडलेल्या औद्योगिक क्षेत्राला नव्याने उभारी येण्यासाठी उद्योग लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असून, उद्योजकांच्या नजरा लॉकडाऊन शिथिलतेकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील उद्योजकांच्या लॉकडाऊन शिथिलतेकडे नजराजिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंड

महालिंग सलगर कुपवाड : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंडावली आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांना घरघर लागली आहे. अडचणीत सापडलेल्या औद्योगिक क्षेत्राला नव्याने उभारी येण्यासाठी उद्योग लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असून, उद्योजकांच्या नजरा लॉकडाऊन शिथिलतेकडे लागल्या आहेत.जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी, इस्लामपूर, जत, कडेगाव, पलूस, शिराळा, विटासह इतर सहकारी औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे. येथे तीन हजारहून अधिक उद्योग आहेत. यात टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंग, अन्न प्रक्रिया उद्योगासह इतरांचा समावेश आहे. आधीच आर्थिक मंदी आणि गतवर्षीच्या पुरामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये निराशेचे चित्र दिसून येत होते. त्यातच अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे उद्योजक अडचणीत सापडले आहेत.मार्च महिन्यात अचानक आलेल्या या संकटामुळे उद्योगांचे कंबरडेच मोडले असून सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. उत्पादित मालाचा साठाही मोठ्या प्रमाणात पडून आहे. भविष्यात उद्योग बंदी उठविल्यानंतर उद्योजकांकडून हा उत्पादित माल ग्राहकांकडे पाठविल्यानंतर त्याची देयके लवकर येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यातच आर्थिक टंचाईतून मार्गक्रमण करीत असलेल्या उद्योजकांना कामगारांचा पगार देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली