शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कारागृहात नव्याने दाखल कैद्यांची स्वतंत्र सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:15 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे.

ठळक मुद्देकारागृहात नव्याने दाखल कैद्यांची स्वतंत्र सोयकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; कारागृहातील २५ कैद्यांना अंतरिम जामीन मंजूर

सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे.

कारागृहालगत असलेल्या एका शाळेतील दोन खोल्यांमध्ये ३६ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कै द्यांना पॅरोलवर सोडण्याची घोषणा केली होती त्यानुसार जिल्हा कारागृहातील २५ कैद्यांना अंतरीम जामीन मंजूर झाला आहे.कोरोना संसर्ग वाढत असतानाच कारागृहात असलेल्या कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न राज्यभर निर्माण झाला होता. राज्यातील काही कारागृहांमधील कैद्यांनाही कोरोनाचे निदान झाल्याने अधिक सतर्क ता बाळगली जात होती. त्यामुळे जिल्हा कारागृहातही खबरदारी घेण्यात येत आहे.

त्यामुळे नव्याने कारागृहात दाखल होणाऱ्या कैद्यांकडून संसर्गाची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी कारागृहालगतच असलेल्या एका शाळेच्या दोन खोल्या ताब्यात घेत त्यात ३६ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. याठिकाणी कारागृह आणि पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कारागृहातील संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाने पंधरवड्यापूर्वी कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा कारागृहातील २५ कैद्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा कारागृहात २३५ कैद्यांची क्षमता असून सध्या ३३६ कैदी आहेत.

क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने अडचणी येत असल्यातरी प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. यामुळेच नव्याने विविध गुन्ह्यातील बाहेरून येणाऱ्या कैद्यांना जून्या कैद्यांच्या संपर्कात ठेवण्याचे टाळत त्यांची स्वतंत्र इमारतीत सोय करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात येत आहे. त्याठिकाणी सुविधा व कारागृह कर्मचारी, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नव्याने येणाऱ्या कैद्यांमुळे अगोदर असलेल्या कैद्यांना संसर्ग होऊ नये यासाठी अशी खबरदारी घेण्यात येत आहे.सुशिल कुंभार, मुख्य तुरूंग अधिकारी,सांगली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली