शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:12 IST

कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेटआणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या

सांगली : कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.मंगळवेढा तालुक्यातील धुळाप्पा केंगार हे कुटुंबासह काही महिन्यांपूर्वी राजापूर तालुक्यात रस्त्याच्या कामावर होते. तेथे जावडे गावातील माध्यमिक आश्रमशाळेत त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत होत्या. वर्षा व सुवर्णा या दोन मुली सातवी व तिसरीच्या वर्गात होत्या. लॉकडाऊनपूर्वी धुळाप्पा हे सांगलीत हनुमाननगरमध्ये राहण्यास आले, पण मुली शिक्षणासाठी राजापूरलाच राहिल्या.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला अन् मुलींची भेट या कुटुंबाला दुर्मिळ झाली. तिकडे मुलींनाही घरची आठवण होत होती. त्याही दररोज दूरध्वनी करून परत नेण्याची मागणी करीत होत्या. त्यांच्या आर्त हाकेने बापाच्या हृदयाची घालमेल होत होती. मुलींना परत आणण्यासाठी शासकीय पास काढावा लागतो, वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज केंगार यांच्याकडे नव्हती. त्यामुळे मुलींचंी कधी भेट होणार, याचीच चिंता त्यांना होती.केंगार यांनी नगरसेवक अभिजित भोसले यांची भेट घेतली व मुलींना परत आणा, अशी साद घातली. भोसले यांनी राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर परिसरातील मित्रांशी संपर्क साधला. राजापूरहून कोल्हापूर अथवा सांगलीला कोण येणार आहे का, याची चौकशी केली. अखेर चार दिवसांच्या प्रयत्नानंतर राजापूर येथील मेहबूब मठद हे कोल्हापूरला कामानिमित्त येणार होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वाहनातून या दोन्ही मुलींना कोल्हापूरपर्यंत आणण्याची विनंती केली. मठद यांनीही सहमती दर्शविली.

दोन्ही मुली त्यांच्या वाहनातून कोल्हापूरपर्यंत आल्या. तेथून भोसले यांचे मित्र सुमित पाटील यांनी या मुलींना कोल्हापुरातून सांगलीच्या सीमेपर्यंत म्हणजे अंकलीपर्यंत आणले. पण सीमेवर पोलिसांनी मुलींना अडविले. नगरसेवक भोसले, केंगार हेही सीमेवर होते. त्यांनी कोल्हापूर पोलिसांना विनंती केली.

अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनी करून पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर या मुलींची तपासणी करून त्यांना वडिलांच्या ताब्यात दिले. सांगली पोलिसांनीही मुलींची रजिस्टरवर नोंद करून होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या. अखेर ८१ दिवसांनंतर मुलींशी भेट झाल्याने बापाचे डोळेही पाणावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली