लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात बरे झालेल्या पाच रूग्णांचा टाळ्या वाजवून व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिंचणीचे माजी सरपंच संजय पाटील, सुनील पाटील, अमोल सावंत, इकबाल मुल्ला, अभिजीत माने, ऋषिकेश माने, आदी उपस्थित होते.
दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार चिंचणी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु केले आहे. येथे वैद्यकीय उपचारांसह सर्व सोयीसुविधा दिल्या जात आहेत. येथे वीस रूग्ण दाखल आहेत. त्यामधील पाच रूग्णांनी विलगीकरण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला. येथील रुग्णांवर गावातील सर्व खासगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य तपासणी करून उपचार करत आहेत.